Homeताज्या बातम्यादेश

कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना ईडीची नोटीस

पंतप्रधान आवास योजनेत एक हजार कोटींचा घोटाळा

नवी दिल्ली : औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण य

सहायक पोलिस निरीक्षकाने केला आत्महत्येचा प्रयत्न
वीटमधील रस्त्याचे काम निकृष्ट दर्जाचे; संबंधित अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करण्याचा ठराव | LOKNews24
मास्क वापरा, परदेश प्रवास टाळा  

नवी दिल्ली : औरंगाबाद येथील पंतप्रधान आवास योजना घोटाळ्यात अंमलबजावणी संचालनालय अर्थात ईडीने तत्कालीन जिल्हाधिकारी तथा कृषी आयुक्त सुनील चव्हाण यांना चौकशीसाठी नोटीस बजावली असल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे.
या घरकुल योजनेत 1 हजार कोटींचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप झाला होता. त्यानंतर ईडीने औरंगाबादमध्ये तब्बल तेरा ठिकाणी छापे टाकले होते. यानंतर ईडीने महापालिका अधिकार्‍यांची चौकशी केली, तत्कालीन महापालिका आयुक्तांची सुद्धा चौकशी केली होती आणि त्यानंतर आता तत्कालीन जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांना ईडीन चौकशीसाठी बोलावले असल्याची सूत्रांची माहिती आहे. सुनील चव्हाण सद्या कृषी आयुक्त म्हणून कार्यरत आहे.  महापालिकेने पंतप्रधान आवास (घरकुल) योजनेंतर्गत सुमारे 39 हजार घरांचा ‘डीपीआर’ तयार करून निविदा प्रक्रिया पूर्ण केली. फेब्रुवारी 2022 मध्ये टेंडर निघाल्यानंतर समरथ मल्टिबीज इंडिया प्रा. लि., इंडग्लोबल इन्फ्रास्ट्रक्चर सर्व्हिसेस व जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस या कंपन्यांनी एकाच ‘आयपी अ‍ॅड्रेस’वरून टेंडर भरले. यातून कोट्यवधींचा घोटाळा करण्याच्या ते तयारीत होते. या प्रक्रियेत कागदपत्रे सादर करताना पुण्याच्या न्याती कंपनीचे नाव जग्वार ग्लोबल सर्व्हिसेस कंपनीशी जोडण्यात आले. त्यामुळे मूळ न्याती कंपनीचे संचालक नितीन द्वारकादास न्याती, पीयूष नितीन न्याती, प्रवीण नितीन न्याती यांना अनुक्रमे 16, 17 आणि 18 क्रमांकाचे आरोपी करण्यात आले. देशात इतर ठिकाणी घरकुल बाबतची कामे वेगाने होत असताना छत्रपती संभाजी नगर मात्र याबाबतीत पिछाडीवर पडले आहे. त्यामुळे या प्रकरणात ईडी माध्यमातून देखील चौकशी करण्यात येत आहे.

COMMENTS