Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

साईड गटाराच्या कामामुळे शिर्डी-अहिल्यानगर रस्ता अरुंद; अपघात, धुळीने नागरिक हैराण ;डॉ. पिपाडा यांची मंत्री गडकरींकडे तक्रार

शिर्डी : शिर्डी-अहिल्यानगर या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून, संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन केली.  डॉ. पिपाडा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी–अहिल्यानगर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अपघातप्रवण असून या मार्गावर हजारो जणांचा बळी गेला आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. ठेकेदाराकडून संथ गतीने काम होत असल्याने अपघातांची संख्या वाढत असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.  साईड गटार रस्त्याच्या कडेला न घेता मध्यापासून अवघ्या ९ मीटर अंतरावर बांधले जात असल्याने प्रत्यक्ष वापरातील रस्त्याची रुंदी कमी होत आहे. नगरपरिषद हद्दीत किमान १२ मीटर अंतर राखून गटाराचे बांधकाम करावे, जेणेकरून रस्त्याची मूळ रुंदी कायम राहील व भविष्यातील वाढत्या वाहतुकीसाठी सुरक्षितता सुनिश्चित होईल, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात या ठिकाणी अतिक्रमणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्दळीमुळे हा मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत रस्त्याची रुंदी कमी होणे हे भविष्यातील वाहतूक कोंडी व अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.  दरम्यान, संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ उडत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित यंत्रणेकडून कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने पाणी फवारणी, रस्त्यांची स्वच्छता व कामांची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.  याबाबत झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. पिपाडा यांनी दिली. 

निराधार महिलेला मिळाला निवारा; पाथर्डीत नगराध्यक्षांच्या पुढाकारातून उभारले छोटे घर
घरगुती गॅससाठी ‘ई-केवायसी’ बंधनकारक; प्रक्रिया न केल्यास अनुदान थांबण्याची शक्यता
कोपरगावमध्ये 48 घरकुलांना मंजुरी : नगराध्यक्ष संधान

शिर्डी : शिर्डी-अहिल्यानगर या महत्त्वाच्या मुख्य रस्त्यावर सुरू असलेल्या साईड गटाराच्या कामामुळे रस्त्याची रुंदी कमी होत असून, संथगतीने सुरू असलेल्या कामांमुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. तसेच उडणाऱ्या धुळीमुळे नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला असल्याने या प्रकरणात लक्ष घालावे, अशी मागणी डॉ. राजेंद्र पिपाडा यांनी केंद्रीय रस्ते व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांची समक्ष भेट घेऊन केली.

 डॉ. पिपाडा यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शिर्डी–अहिल्यानगर रस्ता गेल्या अनेक वर्षांपासून अपघातप्रवण असून या मार्गावर हजारो जणांचा बळी गेला आहे. सध्या सुरू असलेल्या कामांमुळे परिस्थिती आणखी गंभीर बनली आहे. ठेकेदाराकडून संथ गतीने काम होत असल्याने अपघातांची संख्या वाढत असून प्रवाशांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

 साईड गटार रस्त्याच्या कडेला न घेता मध्यापासून अवघ्या ९ मीटर अंतरावर बांधले जात असल्याने प्रत्यक्ष वापरातील रस्त्याची रुंदी कमी होत आहे. नगरपरिषद हद्दीत किमान १२ मीटर अंतर राखून गटाराचे बांधकाम करावे, जेणेकरून रस्त्याची मूळ रुंदी कायम राहील व भविष्यातील वाढत्या वाहतुकीसाठी सुरक्षितता सुनिश्चित होईल, अशी मागणीही करण्यात आली आहे. अन्यथा भविष्यात या ठिकाणी अतिक्रमणे वाढण्याची शक्यता नाकारता येत नाही. वर्दळीमुळे हा मार्ग अत्यंत संवेदनशील मानला जातो. अशा परिस्थितीत रस्त्याची रुंदी कमी होणे हे भविष्यातील वाहतूक कोंडी व अपघातांना आमंत्रण देणारे ठरत असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

 दरम्यान, संथ गतीने सुरू असलेल्या कामांमुळे परिसरात मोठ्या प्रमाणात धुळ उडत असून नागरिकांच्या आरोग्यावर त्याचा विपरीत परिणाम होत आहे. लहान मुले, ज्येष्ठ नागरिक व प्रवाशांना श्वसनाचे त्रास, डोळ्यांची जळजळ यांसारख्या समस्यांना सामोरे जावे लागत आहे. संबंधित यंत्रणेकडून कोणतीही प्रतिबंधात्मक उपाययोजना न केल्याने नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. तातडीने पाणी फवारणी, रस्त्यांची स्वच्छता व कामांची योग्य अंमलबजावणी करावी, अशी मागणीही नागरिकांकडून होत आहे.

 याबाबत झालेल्या चर्चेत केंद्रीय मंत्री गडकरी यांनी विषयाची गांभीर्याने दखल घेत सकारात्मक प्रतिसाद दिला असून संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात येतील, असे आश्वासन दिल्याची माहिती डॉ. पिपाडा यांनी दिली. 

COMMENTS