Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

सातारा जिल्हा परिषद भाजपच्या ताब्यात

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे बहुमत

कपीलधार देवस्थान ट्रस्टच्या विश्वस्तांवर गंभीर आरोप; देणगी निधी अपहार,बालविवाहास परवानगी,जैसे थे आदेशाचा भंग, या विषयाची चौकशी करून कारवाई करा-संदीपान चव्हाण,रमेश घुमके
सोन्या-चांदींच्या दरात मोठी घसरण
अकोले बाजार समितीच्या कोतुळ उपबाजार आवारात कांदा मार्केट सूरू शेतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद

मुंबई : सातारा जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीत मोठा राजकीय उलटफेर पाहायला मिळाला. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना यांच्याकडे बहुमताचे संख्याबळ असतानाही भाजपने शेवटच्या क्षणी बाजी मारत सत्ता आपल्या ताब्यात घेतली. पर्यटन मंत्री शंभूराज देसाई, मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांना या निकालाने मोठा धक्का बसल्याची चर्चा आहे. या निवडणुकीत भाजपने 32 सदस्यांचे संख्याबळ दाखवत अध्यक्षपदी आमदार महेश शिंदे यांच्या पत्नी प्रिया शिंदे यांची निवड केली. उपाध्यक्षपदी राजू भोसले यांची निवड झाली.

COMMENTS