Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

डॉक्टर विजयकुमार घाडगे यांच्या रोजा इफ्तार पार्टीत सामाजिक सलोख्याचे दर्शन; हिंदू-मुस्लिम बांधवांचा उत्स्फूर्त सहभाग

चकलांबा : गेवराई तालुक्यातील चकलांबा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विजयकुमार घाडगे यांच्या वतीन

मराठी तरुणांनी आवडीच्या क्षेत्रात समर्पित भावनेने काम करावे ; “मराठी पाऊल पडते पुढे” या चर्चासत्रातील सूर
या कारागृहातील कैद्याचा झाला मृत्यू, घरच्यांनी लावला हत्येचा आरोप | LOKNews24
मुन्नाभाई डॉक्टरकडून अवैध गर्भपात

चकलांबा : गेवराई तालुक्यातील चकलांबा जिल्हा परिषद गटाचे माजी सदस्य तथा राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस डॉक्टर विजयकुमार घाडगे यांच्या वतीने रमजान महिन्यानिमित्त बुधवार रोजी भव्य रोजा इफ्तार पार्टीचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमातून सामाजिक एकोपा, बंधुता आणि सर्वधर्म समभावाचा सुंदर संदेश देण्यात आला.
मुस्लिम समाजाचा पवित्र रमजान महिना सुरू असून, या निमित्ताने दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती इंग्लिश स्कूल येथे इफ्तार कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. संध्याकाळी रोजा सोडण्याच्या वेळेला विविध गावांतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहिले. या कार्यक्रमात हिंदू आणि मुस्लिम बांधवांनी एकत्र येत आपुलकीने इफ्तार करून सामाजिक सलोखा जपला. चकलांबा, महांडुळा, हिवरवाडी, रसलाबाद, महार टाकळी, शेकटा तसेच परिसरातील अनेक गावांमधून नागरिकांनी उपस्थिती दर्शवली. कार्यक्रमात स्थानिक नेते, माजी पदाधिकारी, सामाजिक कार्यकर्ते, ग्रामपंचायत सदस्य तसेच युवक वर्ग मोठ्या प्रमाणावर सहभागी झाला होता. या उपस्थितीमुळे कार्यक्रमाला अधिक उत्साहाचे वातावरण निर्माण झाले. या प्रसंगी गेवराई तालुक्याचे युवा नेते रणवीर काका पंडित, माजी सरपंच गणू आबा खेडकर, माजी सरपंच मारुती काका घुमरे, परमेश्वर महाराज वाघमोडे, बाला नाईक तांड्याचे सरपंच अंबादास सांगळे, माजी पंचायत समिती सदस्य शेख तय्यब भाई, उपसरपंच इस्माईल उस्मान पठाण, माजी ग्रामपंचायत सदस्य माऊली खरे, पशु मामा शेख, संभाजी घाडगे, शिवाजी खेडकर, गंगाराम गुंजाळ, अशोक खेडकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. तसेच पत्रकार गफार सय्यद, शेख सलमान आणि असलम कादरी यांच्यासह विविध सामाजिक क्षेत्रातील कार्यकर्त्यांनीही सहभाग नोंदवला. कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी एकमेकांशी संवाद साधत सामाजिक एकतेचा संदेश दिला. सर्वधर्म समभाव जपण्याची गरज अधोरेखित करत अशा उपक्रमांमुळे गावपातळीवर सलोखा आणि शांतता वाढीस लागते, असे मत व्यक्त करण्यात आले. या कार्यक्रमाचे आयोजन यशस्वी करण्यासाठी आयोजकांनी विशेष परिश्रम घेतले. सर्व उपस्थितांचे स्वागत व नियोजन उत्तम प्रकारे करण्यात आले. कार्यक्रमाच्या शेवटी सुहास घाडगे यांनी उपस्थित हिंदू व मुस्लिम बांधवांचे आभार मानत सर्वांच्या सहकार्यामुळे कार्यक्रम यशस्वी झाल्याचे सांगितले. अशा उपक्रमांमुळे समाजात एकोप्याची भावना अधिक दृढ होत असल्याचेही त्यांनी नमूद केले. या रोजा इफ्तार कार्यक्रमाने पुन्हा एकदा सामाजिक सलोखा, बंधुभाव आणि एकतेचा संदेश देत परिसरात सकारात्मक वातावरण निर्माण केले.

COMMENTS