Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आझाद मैदानावर इनाम जमिनींसाठी दशनाम गोसावी समाजाचे आंदोलन

बीड : आझाद मैदान येथे दिनांक 17 मार्च 2026 रोजी दशनाम गोसावी समाज, गुरव समाज, बैरागी समाज, नाथपंथी गोसावी समाज, लिंगायत समाज व ब्राह्मण समाज यांच

गेवराईत प्रशासनाचा बेजबाबदारपणा शिगेला; लिलाव रक्कम अडकली, तरुणाने जिल्हाधिकार्‍यांकडे आत्महत्येची परवानगी मागितली; तहसीलदारांसह सहा अधिकार्‍यांवर गंभीर आरोप; अडीच वर्षे पैसे न मिळाल्याने कर्जबाजारी तरुणाचा टोकाचा इशारा
लिंबागणेशमध्ये शेतकरी सहवेदना दिवस पाळला; आत्महत्याग्रस्त शेतकर्‍यांना श्रद्धांजली
केज नगरपंचायत घरकुल घोटाळा; बँक खाती ‘गायब’, जीएसटी भरले नाही; चौकशीत धक्कादायक खुलासे

बीड : आझाद मैदान येथे दिनांक 17 मार्च 2026 रोजी दशनाम गोसावी समाज, गुरव समाज, बैरागी समाज, नाथपंथी गोसावी समाज, लिंगायत समाज व ब्राह्मण समाज यांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन करण्यात आले. इनाम जमीन वर्ग 3 ला मालकी हक्क मिळावा तसेच विविध प्रलंबित मागण्यांसाठी हे आंदोलन छेडण्यात आले.
गुरव समाजाचे राष्ट्रीय अध्यक्ष अण्णासाहेब गुरव आणि दशनाम गोसावी समाज परिषदेचे राज्याध्यक्ष ओमप्रकाश गिरी यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन पार पडले. महाराष्ट्रभरातून गोसावी-गुरव समाज बांधव तसेच इनामदार मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. या आंदोलनात अ‍ॅड. राजेंद्र बन (संस्थापक, दशनाम गोसावी समाज परिषद बीड), महंत दत्तात्रय गिरी महाराज (जिल्हाध्यक्ष), संजय गुरव (जिल्हाध्यक्ष, बीड), कैलास गोसावी (गोसावी सेना, महाराष्ट्र) आदींनी प्रमुख भूमिका घेतली. त्यांनी इनाम जमिनींना पीक कर्ज, पिक विमा, शासकीय अनुदान व विविध शासकीय योजना लागू कराव्यात, इनाम जमिनीवरील बेकायदेशीर अतिक्रमणे हटवावीत तसेच मठ-मंदिरांना संरक्षण द्यावे, अशी ठाम मागणी केली. याशिवाय विरासत कार्यवाही तात्काळ पूर्ण करावी व इनामधारकांच्या हक्कांचे संरक्षण करावे, अशीही मागणी शासनाकडे करण्यात आली. आंदोलनादरम्यान समाजाच्या विविध प्रश्नांवर आवाज उठवून शासनाला निवेदन सादर करण्यात आले. या वेळी राज्यभरातील प्रतिनिधी म्हणून गणेश शंकर बुवा पुरी, मुकुंद शिव गिरी (परभणी), दयानंद विठ्ठल बुवा भारती (परभणी), भगवान बाळ गिरी (पिंपरखेड, बीड), संदीप भारत पुरी (मुंबई), नवनाथ काशिनाथ पुरी (परभणी), दत्ता गोरख भारती (सातारा), किशोर अंकुश भारती (नागेशवाडी, बीड), मुकुंद कुलकर्णी, शिवाजी गणा बुवा पुरी, राजेंद्र रामराव पुरी (धाराशिव), रमेश पुरी, विलास गिरी (मुंबई), गणेश गिरी, ओम चैतन्य गिरी, सूर्यकांत गिरी (पुणे) आदी उपस्थित होते.

COMMENTS