Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

शेवगावसाठी विशेष निधीसह घरकुलांची मागणी; डॉ. क्षितीज घुले यांचे मुख्यमंत्री फडवणीस यांना निवेदन

शेवगाव : शहर व तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांना हक्काची घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी पंचायत समिती शेवगावचे माजी सभापती डॉ. क्षितीज नरेंद्र घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे. मुंबई येथे मंगळवारी (दि. १७) सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेवगाव नगरपरिषद क्षेत्रातील झोपडपट्टी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेल्या चार ते पाच दशकांपासूनही हक्काची घरकुले मिळालेली नाहीत. त्यामुळे या रहिवाशांना घरकुल योजनेंतर्गत घरे मंजूर करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच, शेवगाव नगरपरिषद हद्दीत विविध विकासकामे प्रलंबित असून, ती मार्गी लावण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे. याशिवाय, शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनाही विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि सुशोभीकरण यांसारख्या कामांसाठी निधीची तीव्र गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे. शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे. दरम्यान, या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनाही देण्यात आल्या आहेत.

सोशल मीडियावर बदनामी पडणार महागात; राज्य सरकारकडून पोलिस महासंचालकांच्या नेतृत्वाखाली समिती स्थापन
..तर, महाराष्ट्र 2028 पर्यंत आर्थिक दिवाळखोरीत निघेल; राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांचा इशारा
अधिवेशनाच्या काळातच उपमुख्यमंत्री शिंदेंचा दिल्ली दौरा

शेवगाव : शहर व तालुक्यातील सर्वांगीण विकासासाठी तसेच झोपडपट्टी भागातील नागरिकांना हक्काची घरकुले उपलब्ध करून देण्यासाठी तातडीने विशेष निधी मंजूर करावा, अशी मागणी पंचायत समिती शेवगावचे माजी सभापती डॉ. क्षितीज नरेंद्र घुले यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

मुंबई येथे मंगळवारी (दि. १७) सादर करण्यात आलेल्या या निवेदनात नमूद करण्यात आले आहे की, शेवगाव नगरपरिषद क्षेत्रातील झोपडपट्टी भागांमध्ये राहणाऱ्या नागरिकांना गेल्या चार ते पाच दशकांपासूनही हक्काची घरकुले मिळालेली नाहीत. त्यामुळे या रहिवाशांना घरकुल योजनेंतर्गत घरे मंजूर करून त्यांचे तातडीने पुनर्वसन करण्यात यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

तसेच, शेवगाव नगरपरिषद हद्दीत विविध विकासकामे प्रलंबित असून, ती मार्गी लावण्यासाठी विशेष निधी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद आहे. शहराच्या सर्वांगीण विकासासाठी रस्ते, पाणीपुरवठा, स्वच्छता आणि इतर मूलभूत सुविधांवर भर देण्याची गरज अधोरेखित करण्यात आली आहे.

याशिवाय, शेवगाव तालुक्यातील ग्रामपंचायतींनाही विकासासाठी निधी उपलब्ध करून देण्याची मागणी करण्यात आली आहे. ग्रामीण भागातील रस्ते, पाणीपुरवठा, वीजपुरवठा आणि सुशोभीकरण यांसारख्या कामांसाठी निधीची तीव्र गरज असल्याचेही नमूद करण्यात आले आहे.

शहर व ग्रामीण भागातील नागरिकांच्या मूलभूत गरजा पूर्ण करण्यासाठी आणि प्रलंबित विकासकामांना गती देण्यासाठी शासनाने तातडीने सकारात्मक निर्णय घ्यावा, अशी अपेक्षा या निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

दरम्यान, या निवेदनाच्या प्रती महसूलमंत्री महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे तसेच पर्यावरण व पशुसंवर्धन मंत्री पंकजा मुंढे यांनाही देण्यात आल्या आहेत.

COMMENTS