Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाण्याअभावी शेवगावमध्ये लावलेली झाडे जळाली; १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतील कामावर प्रश्नचिन्ह; ठेकेदाराबाबत संताप

शेवगाव : शेवगाव नगर परिषद हद्दीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाला मोठा धक्का बसला असून, पाण्याअभावी लावलेली झाडे जळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. नगर परिषदेने वृक्षारोपणासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. संबंधित ठेकेदाराने झाडांची लागवड केली; मात्र त्यानंतर झाडांची योग्य देखभाल न केल्याने व पाणीपुरवठा न झाल्याने ही झाडे पूर्णपणे जळून गेली आहेत. शेवगाव–माळेगाव रोड, शेवगाव–पाथर्डी रोड तसेच नगर परिषद हद्दीतील विविध भागांतील झाडांचा यात समावेश आहे.सुमारे सहा फूट उंचीची झाडे जळाल्यामुळे पर्यावरणीय हानी झाली असून, नगर परिषदेच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे. यासंदर्भात नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी जगदीश जाधवर यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला आतापर्यंत चार वेळा नोटिसा देण्यात आल्या आहेत. तरीही ठेकेदाराकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट, राजकीय दबावाचा वापर करून काम टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला. दरम्यान, या निष्काळजीपणाबद्दल संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शेवगाव शहरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्येही मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

याची देही याची डोळा ऐसा अनुभवला शिर्डी परिक्रमेचा सोहळा
जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले यांच्याहस्ते अनाथ बालकांना योजनेच्या लाभपत्रांचे वाटप
नगर अर्बन बँकेच्या कर्जखात्यांचे फॉरेन्सिक ऑडीट

शेवगाव : शेवगाव नगर परिषद हद्दीत १५ व्या वित्त आयोगाच्या निधीतून करण्यात आलेल्या वृक्षारोपण उपक्रमाला मोठा धक्का बसला असून, पाण्याअभावी लावलेली झाडे जळाल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. या घटनेमुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.

नगर परिषदेने वृक्षारोपणासाठी खासगी ठेकेदाराची नियुक्ती केली होती. संबंधित ठेकेदाराने झाडांची लागवड केली; मात्र त्यानंतर झाडांची योग्य देखभाल न केल्याने व पाणीपुरवठा न झाल्याने ही झाडे पूर्णपणे जळून गेली आहेत. शेवगाव–माळेगाव रोड, शेवगाव–पाथर्डी रोड तसेच नगर परिषद हद्दीतील विविध भागांतील झाडांचा यात समावेश आहे.सुमारे सहा फूट उंचीची झाडे जळाल्यामुळे पर्यावरणीय हानी झाली असून, नगर परिषदेच्या कामकाजाबाबत नागरिकांच्या मनात रोष निर्माण झाला आहे.

यासंदर्भात नगर परिषदेचे आरोग्य कर्मचारी जगदीश जाधवर यांनी सांगितले की, संबंधित ठेकेदाराला आतापर्यंत चार वेळा नोटिसा देण्यात आल्या आहेत. तरीही ठेकेदाराकडून कोणतीही ठोस कार्यवाही करण्यात आलेली नाही. उलट, राजकीय दबावाचा वापर करून काम टाळण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोपही त्यांनी केला.

दरम्यान, या निष्काळजीपणाबद्दल संबंधित ठेकेदाराविरुद्ध कठोर कारवाई करण्याची मागणी शेवगाव शहरातील नागरिकांकडून होत आहे. तसेच या प्रकारामुळे वृक्षप्रेमींमध्येही मोठी नाराजी व्यक्त केली जात आहे.

COMMENTS