रस्त्यावर गॅस सिलेंडर वितरणाला पूर्णविराम; भानेश्वर गॅस एजन्सीचा निर्णय; आता ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच होणार वितरण

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

रस्त्यावर गॅस सिलेंडर वितरणाला पूर्णविराम; भानेश्वर गॅस एजन्सीचा निर्णय; आता ग्राहकांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच होणार वितरण

श्रीगोंदा : शहरात व परिसरात रस्त्यावर होणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत दैनिक ‘लोकमंथन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत भानेश्वर गॅस एज

धरणात बुडून युवकाचा मृत्यू
सर्वोदय विद्यामंदिरला तीन लाखांचे शैक्षणिक साहित्य
मढेवडगाव सोसायटीच्या अध्यक्षपदी वाबळे; नाशिकहून मित्रपरिवार श्रीगोंद्यात
The current image has no alternative text. The file name is: download-3-2.jpg

श्रीगोंदा : शहरात व परिसरात रस्त्यावर होणाऱ्या घरगुती गॅस सिलेंडर वितरणाबाबत दैनिक ‘लोकमंथन’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्ताची दखल घेत भानेश्वर गॅस एजन्सीने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. रस्त्यावर सिलेंडरचे वितरण तात्काळ बंद करण्यात आले असून, यापुढे सर्व ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच सिलेंडर वितरित करण्यात येणार असल्याची माहिती एजन्सीचे व्यवस्थापक डॉ. भूषण हिंगणे यांनी दिली.

रस्त्यावर सिलेंडर वितरणामुळे अपघाताचा धोका वाढत असल्याने तसेच सुरक्षेच्या दृष्टीने व शासनाच्या नियमांचे पालन करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शहरातील विविध भागांत रस्त्याच्या कडेला सिलेंडरचे वितरण होत असल्याने नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते.

या पार्श्वभूमीवर एजन्सीने तत्काळ कारवाई करत ही पद्धत बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. यापुढे ग्राहकांना त्यांच्या नोंदणीकृत पत्त्यावरच सिलेंडर मिळणार असून वितरण प्रक्रियेत शिस्त आणण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

तसेच ग्राहकांनीही रस्त्यावर सिलेंडर घेण्याचा आग्रह करू नये, असे आवाहन एजन्सीकडून करण्यात आले आहे. नियमांचे उल्लंघन केल्यास संबंधितांवर कारवाई केली जाईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

या निर्णयामुळे शहरातील गॅस वितरण व्यवस्थेत शिस्त येण्यास मदत होणार असून नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यात आले असल्याचे डॉ. हिंगणे यांनी सांगितले. 

COMMENTS