Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

धाकटी नदीवरील नवीन पुलाचे भूमिपूजन; भाविकांची होणार गैरसोय दूर; प्रा. राम शिंदेंकडून मंजुरी

जामखेड : परिसरातील ग्रामदैवत नागेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या धाकटी नदीवरील लोखंडी पुल सहा महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळल्याने नागरिक, भाविक आणि व

कला, क्रीडा आणि साहित्य क्षेत्रातील प्रगतीही महत्त्वाचीमंत्री चंद्रकांत पाटील; 65 व्या महाराष्ट्र राज्य कला प्रदर्शन प्रसंगी विविध कला पुरस्कारांचे वितरण
विधानभवनासमोर तरुणाचा आत्मदहनाचा प्रयत्न; पोलिसांच्या तत्परतेने अनर्थ टळला
शेतकरी, बेरोजगारी अन् बीडच्या विकासावर खा.सोनवणेंनी संसदेत उठविला आवाज; लोकसभा अध्यक्षाविरूध्द आलेल्या अविश्वास ठरावाच्या समर्थनार्थही केले मुद्देसूद भाषण

जामखेड : परिसरातील ग्रामदैवत नागेश्वर मंदिराकडे जाणाऱ्या धाकटी नदीवरील लोखंडी पुल सहा महिन्यांपूर्वी अतिवृष्टीमुळे कोसळल्याने नागरिक, भाविक आणि विद्यार्थ्यांची मोठी गैरसोय होत होती. या पार्श्वभूमीवर नवीन पुलाच्या बांधकामासाठी नगरपरिषदेच्या वतीने भूमिपूजन करण्यात आले. नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी यांच्या हस्ते हा कार्यक्रम पार पडला.

 यावेळी नगराध्यक्षा प्रांजल अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, सभापती श्रीराम डोके, सीमा कुलकर्णी, नगरसेवक प्रा. विकी घायतडक, प्रविण चोरडिया, अमित चिंतामणी, मनोज कुलकर्णी, प्रविण होळकर, अनिकेत बांदल, म्हेत्रे महाराज, सागर टकले, यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 

  अतिवृष्टीमुळे पुल कोसळल्यानंतर नागेश्वर मंदिराकडे जाण्यासाठी भाविकांना व नागरिकांना मोठा वळसा घालून प्रवास करावा लागत होता. विशेषतः शालेय विद्यार्थी आणि तुळजापूरकडे जाणाऱ्या धार्मिक पालखी मार्गालाही याचा फटका बसत होता. नदीला पाणी असल्यास भाविकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. ही परिस्थिती लक्षात घेऊन विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे यांनी नवीन पुलासाठी मंजुरी दिली. त्यानुसार नगरपरिषदेच्या माध्यमातून या कामाला सुरुवात करण्यात आली आहे.

१२ फुटी पादचारी पुलामुळे होणार सोय

धाकटी नदीवरील नवीन पुल हा १२ फूट रुंदीचा पादचारी पुल असणार असून, यामुळे भाविक, विद्यार्थी आणि स्थानिक नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. तसेच तुळजाभवानी मातेचा बुऱ्हानगरवरून येणारा पालखी मार्गही याच पुलावरून जात असल्याने धार्मिकदृष्ट्याही या पुलाचे महत्त्व अधोरेखित होते.

अडीच कोटींच्या विकासकामांचा भाग

 यावेळी बोलताना अमित चिंतामणी यांनी सांगितले की, नागेश्वर मंदिर परिसराच्या तीर्थक्षेत्र विकास व सुशोभीकरणासाठी प्रा. राम शिंदे यांनी सुमारे अडीच कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला होता. त्यामध्ये लोखंडी पुल, दशक्रिया विधी घाट आणि सिमेंट रस्त्यांचा समावेश होता. मात्र सप्टेंबर महिन्यातील अतिवृष्टीमुळे जुना लोखंडी पुल खचला. त्यामुळे निर्माण झालेली अडचण दूर करण्यासाठी नव्या पुलास पुन्हा मंजुरी देण्यात आली आहे.

COMMENTS