जोरदार पावसाचे इस्लामपूरच्या घरकुलात पाणी; नागरीकांच्या मदतीसाठी नगराध्यक्ष घटनास्थळी

Homeमहाराष्ट्र

जोरदार पावसाचे इस्लामपूरच्या घरकुलात पाणी; नागरीकांच्या मदतीसाठी नगराध्यक्ष घटनास्थळी

उरूण-इस्लामपूर शहरात काल रात्रीपासून जोराचा पाऊस झाल्याने नाले गटारी व रस्ते पहाटेपर्यत ओसंडुन वाहु लागले होते तर शहरातील कापुसखेड नाका परिसरातील घरकुल इमारती परीसरात पावसाचे पाणी साचुन राहिले होते.

बावनकुळेंच्या वक्तव्यानंतर विरोधकांची टीकेची झोड
मान्सूनची वाटचाल मंदावली
पाइपलाईन फुटल्याने हजारो लिटर पाणी वाया

इस्लामपूर / प्रतिनिधी : उरूण-इस्लामपूर शहरात काल रात्रीपासून जोराचा पाऊस झाल्याने नाले गटारी व रस्ते पहाटेपर्यत ओसंडुन वाहु लागले होते तर शहरातील कापुसखेड नाका परिसरातील घरकुल इमारती परीसरात पावसाचे पाणी साचुन राहिले होते. आज सकाळी घरकुलातील काही नागरिकांनी पालिकेचे नगराध्यक्ष व भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्याशी संपर्क करुन परिस्थिती सांगितली. तात्काळ नगराध्यक्ष  घरकुलाकडे धाव घेत परिस्थितीची पहाणी करून नागरिकांशी संवाद साधला. तात्काळ उपाययोजनेमुळे घरकुलातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले.

कापुसखेड नाका परिसरात घरकुलाच्या इमारती गेल्या अनेक वर्षापुर्वी उभा केल्या आहेत. मात्र, इमारतीचे फांऊडेशन हे कमी उंचीचे व गटारीचे योग्य नियोजन तात्कालीन लोकप्रतिनिधी व प्रशासनाने न केल्याने कापुसखेड नाका परिसरात पडलेल्या पावसाचे पाणी घरकुल परिसरात साचुन राहिले. काल रात्रीच्या जोराच्या पावसाने पुन्हा प्रत्येक वर्षीप्रमाणे पाणी साचल्याने नागरीकांनी थेट नगराध्यक्ष निशिकांत भोसले-पाटील यांच्याशी संपर्क साधला. यावेळी तात्काळ उपाययोजनेला सुरुवात झाली व पाण्याचा निचरा होऊ लागला.

सध्य परिस्थीतीत जेसीबीने साचलेले पाणी गटर खोदून ओढ्याला सोडण्याचे काम निशिकांत भोसले यांच्या सुचनेनुसार युध्दपातळीवर सुरु झाले आहे. त्यामुळे परिसरातील पाण्याचा निचरा झपाट्याने होऊ लागला आहे.

यावेळी सतेज जयवंत पाटील, जफर खाटिक, फिरोज मुंडे, युसूफ मुंडे, राजू पठाण, अर्जुन बडे, राकेश दाटिया, सचिन राठोड, सौरभ कांबळे, अधिक माने, सुरेश कुकडे, पोपट भोसले, रशिद वारर्से, सूर्यकांत वडार, आरबाज मुल्ला, कैलास महापुरे, रियाज पटेल, नगरपालिकेचे अधिकारी-कर्मचारी व भाजपाचे कार्यकर्ते उपस्थित होते.

COMMENTS