कोपरगाव : सहकारमहर्षी स्व.कोल्हे यांची क्षमता मोठी होती; ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती. सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची ताकद त्यांच्या नीतिमत्तेत होती. माझा शेतकरी जगला पाहिजे, हाच विचार त्यांनी मनात ठेवून आंदोलन उभं केलं. त्यावेळी सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा गौण मानून त्यांनी कधीही ओशाळपणा दाखवला नाही, असा मनोदय धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केला. माजी मंत्री तथा सहकारमहर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट, कोपरगाव यांच्या वतीने भव्य कीर्तन सेवेचे आयोजन सोमवार, दिनांक 16 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते. यावेळी धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा पार पडली. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी सिंधूताई कोल्हे, नितीन कोल्हे,बिपीन कोल्हे, मा. आ. स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कर्तुत्ववान नेतृत्वाचे कौतुक करताना, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना शेवाळे महाराज म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेबांच्या शब्दाला जिकडे जाईल तिकडे किंमत होती. ज्याचं त्याला दान द्यायचं देऊन ते देवाघरी निघून गेले. स्व. कोल्हे साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय दिला, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्वार खुले केले. स्वर्गीय कोल्हे यांनी बांधलेला डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात, ही चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे. यानंतर त्यांनी साखर कारखाना उभारला. सलग सहा वेळा आमदारकी भूषवली. एकदा आमदार होणं अवघड असतं, परंतु मन जिंकलं तर मतं जिंकण्याची गरज पडत नाही. स्व. कोल्हे साहेबांनी लोकांची मनं जिंकली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विवेक कोल्हे यांनी थेट सहकार मंत्री व गृहराज्यमंत्री अमित शहा यांना कोपरगावात आणले आणि त्यांच्या मुखातून विवेक कोल्हेंचे कौतुकही झाले. स्वर्गीय कोल्हे साहेबांची तीच बौद्धिक क्षमता कोल्हे कुटुंबीय पुढे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.

कोपरगाव : सहकारमहर्षी स्व.कोल्हे यांची क्षमता मोठी होती; ते दूरदृष्टी असलेले नेते होते. सगळ्यांना सोबत घेऊन चालणे हीच त्यांची कला होती. सत्तेत असताना सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलन करण्याची ताकद त्यांच्या नीतिमत्तेत होती. माझा शेतकरी जगला पाहिजे, हाच विचार त्यांनी मनात ठेवून आंदोलन उभं केलं. त्यावेळी सत्ता, पद, प्रतिष्ठा आणि पैसा गौण मानून त्यांनी कधीही ओशाळपणा दाखवला नाही, असा मनोदय धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे यांनी व्यक्त केला.
माजी मंत्री तथा सहकारमहर्षी स्वर्गीय शंकरराव कोल्हे यांच्या चतुर्थ पुण्यस्मरणानिमित्त कोपरगाव येथील तहसील कार्यालय मैदानात सहकार महर्षी शंकररावजी कोल्हे विचारधारा ट्रस्ट, कोपरगाव यांच्या वतीने भव्य कीर्तन सेवेचे आयोजन सोमवार, दिनांक 16 मार्च 2026 रोजी करण्यात आले होते. यावेळी धर्माचार्य ह.भ.प. शंकर महाराज शेवाळे (मंचर, पुणे) यांच्या सुश्राव्य वाणीतून कीर्तन सेवा पार पडली. यावेळी ते मनोगत व्यक्त करताना बोलत होते. याप्रसंगी सिंधूताई कोल्हे, नितीन कोल्हे,बिपीन कोल्हे, मा. आ. स्नेहलता कोल्हे, अमित कोल्हे, विवेक कोल्हे, सुमित कोल्हे, ईशान कोल्हे, रेणुका कोल्हे, श्रद्धा कोल्हे, नगराध्यक्ष पराग संधान सर्व नगरसेवक, विविध संस्थांचे पदाधिकारी कार्यकर्ते, शंकरराव कोल्हे विचारधारा ट्रस्टचे पदाधिकारी आदीसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री शंकरराव कोल्हे यांच्या कर्तुत्ववान नेतृत्वाचे कौतुक करताना, त्यांच्या आठवणींना उजाळा देताना शेवाळे महाराज म्हणाले की, माजी मंत्री स्व. शंकरराव कोल्हे साहेबांच्या शब्दाला जिकडे जाईल तिकडे किंमत होती. ज्याचं त्याला दान द्यायचं देऊन ते देवाघरी निघून गेले. स्व. कोल्हे साहेबांनी शेतकऱ्यांना न्याय दिला, गोरगरिबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी द्वार खुले केले.
स्वर्गीय कोल्हे यांनी बांधलेला डॅम पाहण्यासाठी महाराष्ट्रभरातून लोक येतात, ही चिंतन करण्याजोगी गोष्ट आहे. यानंतर त्यांनी साखर कारखाना उभारला. सलग सहा वेळा आमदारकी भूषवली. एकदा आमदार होणं अवघड असतं, परंतु मन जिंकलं तर मतं जिंकण्याची गरज पडत नाही. स्व. कोल्हे साहेबांनी लोकांची मनं जिंकली होती. त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत विवेक कोल्हे यांनी थेट सहकार मंत्री व गृहराज्यमंत्री अमित शहा यांना कोपरगावात आणले आणि त्यांच्या मुखातून विवेक कोल्हेंचे कौतुकही झाले. स्वर्गीय कोल्हे साहेबांची तीच बौद्धिक क्षमता कोल्हे कुटुंबीय पुढे घेऊन जात असल्याचे ते म्हणाले.

COMMENTS