Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जिल्हा परिषदेत एकदिवसीय पाणी गुणवत्ता विषयक प्रशिक्षण कार्यशाळा 

नाशिक प्रतिनिधी - जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत आज पाणी गुणवत्ता कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात एकदिवस

घोड्याने लाथ मारल्याने मामच्या वरातीत भाच्याचा मृत्यू I LOKNews24
लोकसभा निवडणूक स्वबळावर लढवणार ः राजू शेट्टी
गोवरचा विळखा

नाशिक प्रतिनिधी – जिल्हा परिषदेच्या पाणी व स्वच्छता विभागांतर्गत आज पाणी गुणवत्ता कार्यक्रमाबाबत जिल्हा परिषदेच्या रावसाहेब थोरात सभागृहात एकदिवसीय जिल्हास्तरीय प्रशिक्षण कार्यशाळेचे आयेाजन करण्यात आले. कार्यशाळेचे उदघाटन सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, वरिष्ठ भु वैज्ञानिक प्रविण बधान, लेखाधिकारी अनिल उमरे आदिंच्या उपस्थितीत संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन करण्यात आला. यावेळी प्रास्ताविकात बोलताना रविंद्र परदेशी यांनी पाण्याची सुरक्षितता खुप महत्वाची असून सर्वांसाठी शुध्द पाण्याची उपलब्धता ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. ग्रामीण भागातील जनतेला शुद्ध व सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करणे व जलजन्य आजारांवर नियंत्रण ठेवणे हा पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाचा प्रमुख उद्देश असून यासाठी प्रभावीपणे काम करण्याच्या सुचना दिल्या.

दिवसभर आयोजित करण्यात आलेल्या या प्रशिक्ष्ण कार्यशाळेमध्ये अतिरिक्त आरोग्य अधिकारी डॉ. राजेंद्र बागुल यांनी पाण्यांपासून निर्माण होणा-या विविध आजारांबाबत व प्रतिबंधात्मक उपाययोजनांबाबत माहिती दिली. सनियंत्रण व मूलयमापन सल्लागार संतोष धस यांनी जलजीवन कार्यक्रमाच्या मार्गदर्शक सुचना, हर घर जल गाव घोषित करण्याच कार्यवाही, कार्यात्मक नळजोडणी याबाबत माहिती दिली. भूजल विकास यंत्रणेचे कनिष्ठ वैज्ञानिक राहुल बयानी यांनी टीसीएल पावडर तपासणी व गुणवत्ता याबाबत तसेच पाणी नमुना संकलन पध्दत, पाण्याची जैविक व रासायनिक तपासणी याबाबत माहिती दिली. रसायनी हर्षल शेजवळ यांनी प्रयोगशाळा सरंचना व कामे याबाबत मार्गदर्शन केले. अनुजैविक तज्ञ श्रीकांत कानडे यांनी प्रयोगशाळेपर्यत पाणी नमुने कसे पोहोच करावे याबाबत माहिती दिली. माहिती शिक्षण संवाद सल्लागार रविंद्र बराथे यांनी पाणी गुणवत्ता व सनियंत्रण कार्यक्रमाबाबत माहिती दिली.

दुपारच्या सत्रात जिल्हा पाणी गुणवत्ता निरिक्षण किशोर शिरसाळे यांनी पाणी गुणवत्ता सनियंत्रण व सर्वेक्षण कार्यक्रमाची जिल्हयातील सदयस्थितीबाबत माहिती दिली. सुरेश जाधव यांनी स्वच्छता सर्वेक्षणबाबत सविस्तर माहिती दिली. जिल्हा पाणी गुणवत्ता सल्लागार भाग्यश्री बैरागी यांनी एफटीके किटव्दारे पाण्याची तपासणी कशी करावी याबाबत प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केले. सनियंत्रण व मूलयमापन सल्लागार संतोष धस यांनी पाणी गुणवत्ता कार्यकमांतर्गत ऑनलाईन एंन्ट्री करणेबाबत माहिती दिली.  सुत्रसंचालन रविंद्र बराथे यांनी केले. कार्यशाळेस तालुका वैद्यकीय अधिकारी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे उपअभियंता व कनिष्ठ अभियंता, विस्तार अधिकारी (आरोग्य), विसतार अधिकारी (पंचायत), गटसमन्वयक, उपविभागीय पाणी पाणी गुणवत्ता सल्लागार, जिल्हा कक्षातील सल्लागार उपस्थित होते.

जिल्हा परिषदेत संत गाडगेबाबा यांची पुण्यतिथी साजरी –   जिल्हा परिषद नाशिकच्या वतीने महाराष्ट्रातील ग्रामीण भागात स्वच्छतेची शिकवण देऊन समाज सुधारणा करणारे थोर संत गाडगे महाराज यांची जयंती  उपमुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र परदेशी, कार्यकारी अभियंता संदीप सोनवणे यांच्या उपस्थितीत साजरी करण्यात आली. यावेळी संत गाडगेबाबा यांच्या प्रतिमेस अभिवादन करुन त्यांच्या कार्याबाबत माहिती देण्यात आली. सामान्य प्रशासन विभागाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी रविंद्र परदेशी, ग्रामीण पाणी पुरवठा विभागाचे कार्यकारी अभियंता संदिप सोनवणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर मोरे, लेखाधिकारी अनिल उमरे यांच्यासह कर्मचारी उपस्थित होते.

COMMENTS