Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर कोपरगावलाही निधी द्या;आ. काळे; देवस्थानांचा जीर्णोद्धार व भाविकांसाठी सोयी-सुविधांची गरज

कोपरगाव : ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कोपरगाव शहराला २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकप्रमाणेच विशेष निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली आहे. येणाऱ्या साधू-संत व भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच देवस्थानांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांचा विस्तार करण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.  अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा मांडताना आ. काळे यांनी कोपरगावच्या पौराणिक वारशाकडे सरकारचे लक्ष वेधले. दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी आणि तपोभूमी म्हणून कोपरगाव ओळखले जाते. याच भूमीवर त्यांनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि संजीवनी विद्या प्राप्त केली. तसेच देवगुरू बृहस्पती यांचा पुत्र कच आणि शुक्राचार्य यांच्यातील संजीवनी विद्येचा प्रसंगही याच ठिकाणी घडल्याचा उल्लेख त्यांनी केला.  गोदावरी नदीकाठी वसलेले कोपरगाव हे प्राचीन दंडकारण्याचा एक भाग असून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील शुक्राचार्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विवाहासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची आवश्यकता नसते. त्यामुळे वर्षभर मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे येथे पार पडतात.  या सर्व धार्मिक व पौराणिक पार्श्वभूमीमुळे कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून हजारो साधू-संत व भाविक कोपरगावला भेट देतात. त्यामुळे येत्या २०२७ च्या कुंभमेळ्यातही नासिकला येणारे साधुसंत मोठ्या प्रमाणावर कोपरगावला येण्याची शक्यता आहे. कोपरगाव मतदारसंघातील चासनळी, मोर्वीस, कुंभारी, कोपरगाव बेट, संवत्सर, कोकमठाण आणि पुणतांबा येथील प्राचीन देवस्थाने भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. या देवस्थानांचा जीर्णोद्धार, मंदिरांचा विस्तार आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष निधी द्यावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे

कोपरगावमधील ४८ कुटुंबांचे घराचे स्वप्न साकार; आ. काळे यांच्या पाठपुराव्यातून मिळाले यश
शेवगाव तहसीलवर शेतकऱ्यांचा मोर्चा; मोफत भाजीपाला वाटप करून निषेध
गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन

कोपरगाव : ऐतिहासिक व पौराणिक महत्त्व असलेल्या कोपरगाव शहराला २०२७ मध्ये होणाऱ्या कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नाशिकप्रमाणेच विशेष निधी द्यावा, अशी मागणी आमदार आशुतोष काळे यांनी २०२६-२७ च्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात सरकारकडे केली आहे. येणाऱ्या साधू-संत व भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी तसेच देवस्थानांचा जीर्णोद्धार आणि मंदिरांचा विस्तार करण्यासाठी हा निधी आवश्यक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

 अधिवेशनात लक्षवेधी मुद्दा मांडताना आ. काळे यांनी कोपरगावच्या पौराणिक वारशाकडे सरकारचे लक्ष वेधले. दैत्यगुरू शुक्राचार्यांची कर्मभूमी आणि तपोभूमी म्हणून कोपरगाव ओळखले जाते. याच भूमीवर त्यांनी घोर तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले आणि संजीवनी विद्या प्राप्त केली. तसेच देवगुरू बृहस्पती यांचा पुत्र कच आणि शुक्राचार्य यांच्यातील संजीवनी विद्येचा प्रसंगही याच ठिकाणी घडल्याचा उल्लेख त्यांनी केला.

 गोदावरी नदीकाठी वसलेले कोपरगाव हे प्राचीन दंडकारण्याचा एक भाग असून धार्मिकदृष्ट्या अत्यंत महत्त्वाचे स्थान आहे. येथील शुक्राचार्य मंदिराचे वैशिष्ट्य म्हणजे येथे विवाहासाठी कोणत्याही शुभ मुहूर्ताची आवश्यकता नसते. त्यामुळे वर्षभर मोठ्या प्रमाणावर विवाहसोहळे येथे पार पडतात.

 या सर्व धार्मिक व पौराणिक पार्श्वभूमीमुळे कुंभमेळ्याच्या काळात देशभरातून हजारो साधू-संत व भाविक कोपरगावला भेट देतात. त्यामुळे येत्या २०२७ च्या कुंभमेळ्यातही नासिकला येणारे साधुसंत मोठ्या प्रमाणावर कोपरगावला येण्याची शक्यता आहे.

कोपरगाव मतदारसंघातील चासनळी, मोर्वीस, कुंभारी, कोपरगाव बेट, संवत्सर, कोकमठाण आणि पुणतांबा येथील प्राचीन देवस्थाने भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र आहेत. या देवस्थानांचा जीर्णोद्धार, मंदिरांचा विस्तार आणि भाविकांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी शासनाने विशेष निधी द्यावा, अशी मागणी आ. आशुतोष काळे यांनी केली आहे

COMMENTS