Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

चकलंबा पोलिसांची धडक मोहीम : चार कारवायांत तब्बल 37,37,830 चा मुद्देमाल जप्तजुगार, अवैध दारू विक्री, वाळू तस्करी व सोरट जुगारावर कारवाई; अनेक आरोपींवर गुन्हे दाखलचकलांबा परिसरात कोणतेही अवैध धंदे चालू देणार नाही; एपीआय सचिन इंगळे यांचा अवैध धंद्यावाल्यांना इशारा

चकलांबा : चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 37,37,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आ

तांबवा येथे जुन्या वादातून तरुणावर कत्तीने हल्ला,पाच जणांविरुद्ध गुन्हा नोंद
घळाटवाडी मारहाण प्रकरण : आरोपींना तात्काळ अटक करा-अ‍ॅड.सुभाष राऊत मेंढपाळांसह ओबीसी समाजावरील हल्ले कदापी सहन करणार नाहीत; समता परिषदेचा इशा
शिक्षण अधिकार्‍यांच्या आडमुठपणामुळे शिक्षकांची पेन्शन रखडलीसेवानिवृत्त शिक्षक आर्थिक संकटात – सूर्यकांत जोगदंड

चकलांबा : चकलांबा पोलीस स्टेशनच्या हद्दीत पोलिसांनी धडक कारवाई करत चार वेगवेगळ्या ठिकाणी छापे टाकून एकूण 37,37,830 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. या कारवायांमुळे परिसरातील बेकायदेशीर धंद्यांवर पोलिसांनी कडक कारवाईचा इशारा दिला आहे.
पहिल्या कारवाईत पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा टाकून मोटारसायकल, मोबाईल व रोख रक्कम असा 1,07,920 चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी 5 आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींमध्ये अमजद फरीद पठाण (रा. रसुलाबाद ता. गेवराई), दिलीप विष्णु दौंड (रा. चकलांबा), पोपट विठ्ठलराव खेडकर (रा. चकलांबा), दिनकर मुरलीधर तांगडे (रा. चकलांबा) व एक अनोळखी इसम यांचा समावेश आहे. ही कारवाई सपोनि सचिन इंगळे, पोह/प्रधान, पोशि/खटाने, होमगार्ड मिसाळ, माहोनेर व शिरसाट यांनी केली.  दुसर्‍या कारवाईत पोलिसांनी अवैध दारू विक्रीवर छापा टाकून 5,250 चा मुद्देमाल जप्त केला. या प्रकरणी बाळू राजाराम कापसे (रा. भाट अंतरवली) याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई सफौ चांदमारे व पोह पवार यांनी केली. तिसर्‍या कारवाईत मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे राक्षसभुवन शिवारात अवैध वाळू वाहतूक करणारा हायवा पकडण्यात आला. यात हायवा व 4 ब्रास वाळू असा एकूण 35,24,000 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शेख वसीम यासीन (रा. मादळमोही) याच्यावर कारवाई करण्यात आली. ही कारवाई सपोनि सचिन इंगळे, सफौ चांदमारे, पोह पवार, दराडे, होमगार्ड मिसाळ व आव्हाड यांनी केली. चौथ्या कारवाईत उमापूर येथे सोरट खेळणार्‍या 6 इसमांवर छापा टाकून 20,160 रोख व इतर साहित्य 80,500 असा एकूण 1,00,660 चा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपींमध्ये संभाजी राजू शिंदे (रा. बालम टाकळी ता. शेवगाव), आसिफ नसिर शेख (रा. बोधेगाव ता. शेवगाव), शेषराव यशवंत कापसे, अमोल बाबुराव हवाले, आकाश वसंत गायकवाड व हकीम खलील पठाण (सर्व रा. उमापूर) 3यांचा समावेश आहे. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ही सर्व कारवाई पोलीस अधीक्षक नवनित कावत, अप्पर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर व उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल कटके यांच्या मार्गदर्शनाखाली चकलांबा पोलीस ठाण्याचे प्रभारी सपोनि सचिन इंगळे यांच्या पथकाने केली. या सलग कारवायांमुळे परिसरातील बेकायदेशीर धंदे करणार्‍यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

COMMENTS