Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ध्येय गाठण्यासाठी वाचनाचा छंद जोपासावा : आभाळे

अकोले : जीवनातील ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा. जीवनात वाचन संस्कृती अधिक समृद्ध केली तर आपण निश्चित ध्येयापर्यंत जाऊ शक

जिजाऊ ब्रिगेड ‘एकविरा’ चषकचे मानकरी; संगमनेरमधील क्रीडा महोत्सवाची उत्साहात सांगता
जीवघेण्या हल्ल्यांतील आरोपी २४ तासांत जेरबंद; परस्परविरोधी गुन्ह्यांत शेवगाव पोलिसांची धडक कारवाई; मुख्य आरोपींना अटक
गौतम पॉलिटेक्निकमध्ये रोबो विश्व रोबोटिक्स क्लबचे उद्घाटन

अकोले : जीवनातील ध्येय गाठण्यासाठी विद्यार्थ्यांनी वाचनाचा छंद जोपासावा. जीवनात वाचन संस्कृती अधिक समृद्ध केली तर आपण निश्चित ध्येयापर्यंत जाऊ शकतो असे प्रतिपादन सामाजिक कार्यकर्ते भानुदास आभाळे यांनी केले.

पुण्यातील अक्षरभारती या संस्थेने तालुक्यातील महालक्ष्मी माध्यमिक उच्च माध्यमिक विद्यालय पिंपळगाव नाकविंदा विद्यालयास 500 पुस्तकांचे ग्रंथालय शाळेस प्रदान केले. यावेळी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. व्यासपीठावर अक्षरभारतीचे अयाज सय्यद, गणेश वागस्कर, उपक्रमशील शिक्षक भाऊसाहेब कासार आदी उपस्थित होते.  यावेळी भानुदास आभाळे बोलताना पुढे म्हणाले की स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी होण्याचे ग्रामीण विद्यार्थ्यांचे प्रमाण वाढत आहे ही आनंदाची गोष्ट आहे.

यावेळी अयाज सय्यद बोलताना म्हणाले की, वाचनाने माणूस अधिक प्रगल्भ होतो. अक्षरभारती वाचनालयाचा वापर मुलांनी जास्तीत जास्त करावा. जगापुढे जागतिक तापमान वाढ हे मोठे संकट असून त्यासाठी पर्यावरण जतन व संवर्धनाच्या मोहिमेत सहभागी व्हावे असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

यावेळी भाऊसाहेब कासार म्हणाले की, भेटलेली माणसे व वाचलेली पुस्तके माणसांना ज्ञानी बनवितात. विद्यार्थ्यांना दर आठवड्यातून एक दिवशी वाचलेल्या पुस्तकांचा अभिप्राय लिहून त्याची नोंद करावी. वाचन हे मनाचे अन्न आहे. वेळ मिळेल तेव्हा वाचन करत चला तरच आयुष्यात यश मिळेल असे प्रतिपादित केले  पाहुण्यांचे स्वागत व प्रास्ताविक मुख्याध्यापक सुनील धुमाळ यांनी केले. सूत्रसंचालन रामदास कासार यांनी केले. यावेळी स्थानिक स्कूल कमिटीचे अध्यक्ष मारुती आभाळे, सुरज काळे, अक्षरभारतीचे श्रीकांत लगड, महेंद्र बोटे आदि उपस्थित होते.

COMMENTS