पंतप्रधान मोदींचा ’लता मंगेशकर’ पुरस्काराने सन्मान

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पंतप्रधान मोदींचा ’लता मंगेशकर’ पुरस्काराने सन्मान

मुंबई/प्रतिनिधी : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला ’लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सोहळा रविवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे. या

जिल्ह्यातील टँकर घोटाळ्याची सुरू झाली चौकशी ; मागील पाच वर्षांची होणार तपासणी, 102 कोटीच्या गैरव्यवहाराचा संशय
जागतिक विकासासाठी गांधी विचारांची गरज – प्रा. डॉ. सलमान अली मिर्झा
सासरच्यांनी केलेल्या बेदम मारहाणीत मुलीच्या वडिलांचा मृत्यू | DAINIK LOKMNTHAN

मुंबई/प्रतिनिधी : गानसम्राज्ञी लतादीदी मंगेशकर यांच्या नावाने पहिला ’लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार’ सोहळा रविवारी षण्मुखानंद सभागृहात पार पडला आहे. या पहिल्याच पुरस्कार सोहळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सन्मानित करण्यात आले आहे. लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार हा देशसेवा आणि समाज कार्यासाठी दिला जाणारा पुरस्कार आहे. देशाप्रती असलेले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे काम आणि सेवा बघून त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. यावेळी ज्येष्ठ गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर आणि आदिनाथ मंगेशकर यांच्या हस्ते त्यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला आहे. या कार्यक्रमात मंगेशकर कुटुंबीयांसोबत राज्याचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, माजी मुख्यमंत्री आणि विधानसभा विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई उपस्थित होते.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अनुपस्थिती
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लता मंगेशकर पुरस्काराने मुंबईत सन्मानित करण्यात आले. मात्र या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे अनुपस्थित होते. मुख्यमंत्री ठाकरे यांचे नाव निमंत्रण पत्रिकेवर नसल्यामुळे त्यांनी या कार्यक्रमाला जाण्याचे टाळल्याचे बोलले जात आहे.

COMMENTS