Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

विरारमध्ये अवैध शुक्राणू साठवणूक प्रकरणी कारवाई; सायंटिफिक कंपनीच्या आडून बेकायदेशीर वैद्यकीय व्यवसाय

मुंबई : विरार परिसरात अवैधरित्या शुक्राणू साठवून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उघडकीस आणला आ

बांगर कुटुंबियांच्या मागे परळीची ताकद उभा- धनंजय मुंडे
जलसंपदा नोकरभरतीची 27 डिसेंबरपासून परीक्षा
‘अ‍ॅडव्हांटेज विदर्भ’ महोत्सवामुळे विदर्भ उद्योगाच्या केंद्रस्थानी येईल : मुख्यमंत्री फडणवीस

मुंबई : विरार परिसरात अवैधरित्या शुक्राणू साठवून त्याची विक्री केल्याचा धक्कादायक प्रकार वसई-विरार महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाने उघडकीस आणला आहे. कोणतीही वैद्यकीय पात्रता किंवा शासनाची अधिकृत परवानगी नसतानाही दात्यांकडून मिळालेल्या शुक्राणूंची साठवणूक करून त्यांचा व्यापार केला जात असल्याचे तपासात समोर आले आहे. या प्रकरणी दोन जणांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
महापालिकेच्या आरोग्य विभागाला विरारमधील पद्मीबाई टॉवर येथे असलेल्या ‘जीवदानी सायंटिफिक’ या कंपनीत बेकायदेशीर पद्धतीने शुक्राणूंची विक्री केली जात असल्याची माहिती मिळाली होती. या माहितीनुसार महापालिका आयुक्त मनोजकुमार सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाईचे आदेश देण्यात आले. आरोग्य अधिकारी डॉ. भक्ती चौधरी यांनी विशेष वैद्यकीय पथक तयार करून संबंधित ठिकाणी अचानक तपासणी केली.

COMMENTS