मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रूरल एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले नूतन महाविद्यालयात ‘कर्मयोगी ए. बी. चेडे करंडक’ राज्यस्तरीय अंत

मिरजगाव : कर्जत तालुक्यातील मिरजगाव येथील रूरल एज्युकेशन सोसायटीच्या महात्मा फुले नूतन महाविद्यालयात ‘कर्मयोगी ए. बी. चेडे करंडक’ राज्यस्तरीय अंतरमहाविद्यालयीन वकृत्व स्पर्धा पार पडली. स्पर्धेच्या उद्घाटनप्रसंगी डॉ. गणेश करे पाटील हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते.
महाविद्यालयाने सुरू केलेल्या या उपक्रमाचे त्यांनी कौतुक करत कर्मयोगी डॉ. ए. बी. चेडे यांचा मानपत्र देऊन सत्कार केला. प्राचार्य डॉ. तानाजी जाधव यांनी प्रास्ताविक केले. स्पर्धेसाठी राज्यातील विविध जिल्ह्यांमधून ३५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. या स्पर्धेत मुंबईच्या यश रवींद्र पाटील यांनी प्रथम क्रमांक पटकावत १० हजार रुपये व चषक मिळविला. द्वितीय क्रमांक चारुदत्त महादेव माळी (गडहिंग्लज) व चेतन दिनकर पाटील (पुणे) यांनी विभागून घेत ७ हजार रुपये व चषक पटकावले. तृतीय क्रमांक दीक्षा बबन गोळे (कर्जत) यांनी मिळवत ५ हजार रुपये व चषक जिंकला. उत्तेजनार्थ आदित्य ज्ञानेश्वर दराडे, मिनीकचंद पहाडे (संभाजीनगर) व अभय कृष्णकांत आळशी (मुंबई) यांना प्रत्येकी १५०० रुपये व चषक प्रदान करण्यात आले.
बक्षीस वितरण समारंभ डॉ. महेंद्र चेडे, यशराज चेडे, संजय घोडके, अशोक खेडकर व प्राचार्य डॉ. तानाजी जाधव यांच्या उपस्थितीत झाला. स्पर्धेचे परीक्षक म्हणून डॉ. गोपीनाथ बोडके, प्रा. डॉ. स्वप्निल मस्के व डॉ. आप्पा माने यांनी काम पाहिले. या प्रसंगी प्रकाश चेडे, बाळासाहेब देशमुख, अंजली चेडे, जयंत चेडे, गीतांजली चेडे, गुलाबराव तनपुरे, डॉ. चंद्रकांत कोरडे, संपत बावडकर, अमृत लिंगडे, प्रशांत बुद्धिवंत, राजेंद्र गोरे, बबन दळवी, सागर पवळ, सलीम अत्तार, सुगंधीलाल घोडके, मंगेश घोडके, डॉ. पाबळे, पत्रकार तानाजी डाडर, रवींद्र गोरे, अच्युत वीर, हिंगणे, अशोक सूर्यवंशी आदींसह रूरल एज्युकेशन सोसायटीच्या सर्व शाखांचे प्रमुख, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन डॉ. भूषण तागड यांनी केले, तर आभार डॉ. राजेंद्र क्षीरसागर यांनी मानले.

COMMENTS