दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद

Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दरोडा व खुनाच्या गुन्ह्यातील फरारी सराईत गुन्हेगार जेरबंद

अहमदनगर/प्रतिनिधी- कर्नाटक राज्यातील कलादगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगर य

तालुक्यातील शेअरधारकांना वेठीस धरल्यास ‘अंबालिका’ सुरू होऊ देणार नाही : महेंद्र धांडे
नगर अर्बन बँक शेवगाव शाखेचे व्यवस्थापक यांनी केली आत्महत्या
Ahmednagar : अहमदनगर मधून फाईव्ह जी मोबाईल टॉवरला विरोध | LokNews24

अहमदनगर/प्रतिनिधी- कर्नाटक राज्यातील कलादगी पोलिस ठाण्याच्या हद्दीत दरोडा व खुनाच्या गुन्ह्यात फरार असलेला औरंगाबाद जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार नगर येथील सोलापूर रोडवरील वाकोडी फाटा येथे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी शिताफीने पकडला.
याबाबतची माहिती अशी की कर्नाटक राज्यातील बागलकोट जिल्ह्यातील कलादगी पोलीस ठाण्याच्या हद्दीत दरोडा टाकून एका मुलीची हत्या करुन व एका वृध्दास गंभीर जखमी करुन नऊ तोळे वजनाचे सोन्याचे दागिने व 25 हजार रुपये रोख रक्कम चोरांनी दरोडा टाकून चोरुन नेली होती. या घटनेबाबत कलादगी पोलीस ठाणे, कर्नाटक राज्य येथे गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल झाल्यानंतर कर्नाटक पोलिसांनी गुन्ह्याचा तपास करुन गुन्ह्यातील आरोपी निष्पन्न करून कुलकर्णी रामू चव्हाण (रा. बीडकीन, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यास अटक केली. परंतू अटक आरोपीचे इतर साथीदार फरार झाले.
फरार आरोपींची माहिती कर्नाटक पोलिसानी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक अनिल कटके यांना कळविल्याने त्यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पथक हे फरार आरोपींच्या वास्तव्याबाबत गोपनीय माहिती घेवून अहमदनगर जिल्ह्यामध्ये शोध घेत होते. त्या दरम्यान पोलिस निरीक्षक कटके यांना बातमीदारांकडून माहिती मिळाली की, या गुन्ह्यात फरार असलेला आरोपी संतोष नंदू भोसले (रा. बीडकीन) हा वाकोडी फाटा, ता. नगर येथे त्याच्या सासूरवाडीस लपूनछपून राहात आहे, अशी खात्रीशीर माहिती मिळाल्याने पोलिसांनी वाकोडी फाटा येथे जावून सलग दोन दिवस सापळा लावून संतोष भोसले (वय 30, रा. तोंडेवाडी, बिडकीन, ता. पैठण, जि. औरंगाबाद) यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याबाबत कसून चौकशी केली असता त्याने या गुन्ह्यातील सहभागाबाबत माहिती दिल्याने त्यास ताब्यात घेऊन पुढील तपास कामी कलादगी पोलिसांच्या (बागलकोट, कर्नाटक) ताब्यात देण्यात आले आहेत. संतोष भोसले हा सराईत गुन्हेगार असून त्याच्याविरुध्द औरंगाबाद व नांदेड जिल्ह्यामध्ये जबरी चोरी, घरफोडी चोरी, बेकायदा हत्यार बाळगणे असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहेत. अहमदनगर जिल्ह्यातील बेलवंडी, कोतवाली पोलिस ठाणे, बीडकीन पोलिस ठाणे औरंगाबाद, वजीराबाद पोलिस ठाणे. नांदेड येथे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल आहे. त्याला पकडण्याची कारवाई स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकातील सहायक पोलिस निरीक्षक सोमनाथ दिवटे, पोलिस हवालदार सुनील चव्हाण, मनोहर गोसावी, संदीप घोडके, विशाल दळवी, शंकर चौधरी, संदीप दरंदले, ज्ञानेश्‍वर शिंदे, पोलिस कॉन्स्टेबल रणजित जाधव, जालिंदर माने, चालक पोलिस हवालदार उमाकांत गावडे यांनी केली आहे.

COMMENTS