Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जतमध्ये गॅसचा सुरळीत पुरवठा

कर्जत : इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस टंचाईचे सावट निर्माण झाले असून अनेक शहरांमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावा

अमेरिकेची सर्व देशांना रशियन तेल खरेदीची परवानगी
दूरच्या युद्धाचे स्वयंपाकघरावर सावट !
श्रीगोंद्यात भर रस्त्यात गॅस सिलेंडर वितरण; नागरिकांची कोंडी, सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
The current image has no alternative text. The file name is: download-3-2.jpg

कर्जत : इराण–अमेरिका युद्धाच्या पार्श्वभूमीवर देशभरात घरगुती गॅस टंचाईचे सावट निर्माण झाले असून अनेक शहरांमध्ये सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावाव्या लागत आहेत.  कर्जत शहरात याच्या अगदी उलट परिस्थिती पाहावयास मिळत आहे. कर्जत शहरमध्ये  एचपी व भारत गॅस या दोन्ही कंपन्यांच्या गॅस एजन्सीच्या बाहेर कुठेही रांगा लागलेल्या नसून नागरिकांना गॅस पुरवठा सुरू असल्याचे पहावयास मिळाले.

कर्जत शहरातील गॅस एजन्सींकडे सध्या पुरेसा साठा उपलब्ध असून नियमाप्रमाणे ग्राहकांना घरपोच गॅस सिलेंडर देण्यात येत आहे. त्यामुळे कर्जत शहरात गॅस टंचाईची कोणतीही समस्या निर्माण झालेली नसून सिलेंडरसाठी नागरिकांना रांगा लावण्याची वेळ आलेली नाही.

या संदर्भात श्री साई एचपी गॅस एजन्सीचे बिभीषण खोसे पाटील यांच्याशी संपर्क केला असता, त्यांनी सांगितले की पेट्रोलियम मंत्रालय व गॅस एजन्सीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी पाच मार्च रोजी सुरू असलेल्या युद्धाच्या पार्श्वभूमीवर काटेकोरपणे सर्व नियमांचे पालन करण्याबाबत सूचना दिलेल्या आहेत. आमच्या एजन्सीच्या माध्यमातून सर्व ग्राहकांना त्यांच्या अधिकृत मोबाईल नंबर वरून गॅस नोंदणी करून पासबुक घेऊन कार्यालयात संपर्क करण्याबाबत कळवले आहे. त्यानुसार ज्यांनी अधिकृत सिलेंडर साठी नोंदणी केली आहे त्यांना तात्काळ घरपोच सेवा तालुक्यातील ग्रामीण भागामध्ये सर्व ठिकाणी आमच्या कंपनीच्या माध्यमातून देण्यात येत असलयाचे सांगितले. 

  शहरात प्रत्यक्ष पाहणी केली असता, गॅस एजन्सींच्या गोदामांमध्ये पुरेसा साठा उपलब्ध असल्याचे दिसून आले.  ग्रामीण भागातील ग्राहकांना आता नवीन नियमांनुसार सुमारे ४५ दिवसांनंतर पुढील गॅस टाकी मिळणार असून कंपनीच्या निर्देशानुसारच सर्व नागरिकांना गॅस सिलेंडरचे वितरण केले जाणार आहे.

COMMENTS