Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

महिला दिनानिमित्त पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान

देवळाली प्रवरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करून त्

महिलेने स्वतः सक्षम होणे गरजेचे : ऋतुजा गायकवाड
सेंट मेरी चर्चच्या वतीने ‘सन्मान नारी शक्तीचा’ कार्यक्रम
देवळाली प्रवरात ‘श्री समर्थ बाबुराव पाटील महाराज’ यात्रोत्सव

देवळाली प्रवरा : जागतिक महिला दिनाचे औचित्य साधत देवळाली प्रवरा येथील साई प्रतिष्ठानच्या वतीने शहरातील पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करून त्यांच्या योगदानाचा गौरव करण्यात आला. पत्रकारिता हे समाजातील एक जबाबदारीचे आणि आव्हानात्मक क्षेत्र असून पत्रकारांना आपले कर्तव्य पार पाडताना अनेक अडचणी व संकटांचा सामना करावा लागतो. अशा परिस्थितीत त्यांच्या पाठीशी त्यांच्या सौभाग्यवती खंबीरपणे उभ्या राहत असल्यानेच पत्रकारांना आपले कार्य अधिक प्रभावीपणे पार पाडणे शक्य होते, असे मत यावेळी मान्यवरांनी व्यक्त केले.

गुरुवारी सायंकाळी सर्व पत्रकार व त्यांच्या सौभाग्यवती यांच्या हस्ते साईबाबांची आरती करण्यात आली. पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान चिन्ह देवून सन्मान करण्यात आला. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकार समाजातील विविध घडामोडी लोकांपर्यंत पोहोचवण्याचे काम करतात.   पत्रकार रात्री-अपरात्री कामासाठी बाहेर असतानाही घरातील जबाबदाऱ्या सांभाळून त्यांना मानसिक आधार देण्याचे कार्य त्यांच्या पत्नी करत असतात. त्यामुळेच पत्रकारांच्या यशामागे त्यांच्या सौभाग्यवतींचा सिंहाचा वाटा असल्याचेही यावेळी नमूद करण्यात आले.

 या कार्यक्रमात अंजली अंबिलवादे, श्वेता मिसाळ, शाहिन शेख, अनिता उंडे, सिमा घाडगे, अलका लासुरकर, इरफान शेख, स्वाती कदम, अर्चना हुडे, निकिता जाधव, नंदाताई मुसमाडे, शुभांगी संसारे, स्वाती साळवे, गीतांजली विघे, वर्षा सरोदे, प्रिती चित्ते, दिपाली देठे, निशा घोडगे आदी पत्रकारांच्या सौभाग्यवतींचा सन्मान करण्यात आला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संदीप मुसमाडे यांनी केले, तर आभार अनंत कदम यांनी मानले. 

COMMENTS