Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

आठ खासदारांच्या निलंबनावरून लोकसभेत गोंधळ

नवी दिल्ली : लोकसभेत निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांच्या मुद्द्यावरून शुक्रवारी संसदेतील वातावरण तापले. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी

एलपीजीच्या तुटवड्याचे गंभीर परिणाम होऊ शकतात : थरूर
नियमांच्या चौकटीतच बोलण्याचा अधिकार : लोकसभाध्यक्ष बिर्ला
संघ मुख्यालयावर 23 मार्चला धडकणार वंचितचा मोर्चा

नवी दिल्ली : लोकसभेत निलंबित करण्यात आलेल्या आठ खासदारांच्या मुद्द्यावरून शुक्रवारी संसदेतील वातावरण तापले. प्रश्‍नोत्तराचा तास सुरू होताच विरोधी पक्षांच्या सदस्यांनी घोषणाबाजी करत निलंबित खासदारांना पुन्हा सभागृहात प्रवेश देण्याची मागणी केली. त्यामुळे सभागृहात मोठा गोंधळ निर्माण झाला. या मुद्द्यावर विरोधी पक्षातील अनेक नेते आक्रमक झाले होते. खासदारांनी सरकारविरोधात घोषणा देत निषेध व्यक्त केला. गोंधळ वाढत गेल्याने सभागृहाचे कामकाज सुरळीतपणे चालू शकले नाही.
लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी सदस्यांना शांततेचे आवाहन करत संसदेची प्रतिष्ठा जपण्याचे सांगितले. सभागृहातील शिस्त भंग करणारे वर्तन स्वीकारले जाणार नाही, असे स्पष्ट करत त्यांनी सदस्यांना संयम बाळगण्याचे आवाहन केले. मात्र, त्यानंतरही घोषणाबाजी आणि गोंधळ सुरूच राहिला. परिस्थिती नियंत्रणाबाहेर जात असल्याने लोकसभेचे कामकाज प्रथम दुपारी बारा वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले. त्यानंतर कामकाज पुन्हा सुरू करण्यात आले, परंतु गोंधळ कायम राहिल्याने पुन्हा एकदा दुपारी दोन वाजेपर्यंत स्थगिती देण्यात आली. दुपारी दोन वाजता कामकाज सुरू झाले असले तरी ते अल्पकाळच चालले. अखेर सततच्या गोंधळामुळे लोकसभेचे कामकाज 16 मार्चपर्यंत तहकूब करण्याचा निर्णय घेण्यात आला. या गोंधळामुळे महत्त्वाच्या विधेयकांवरील चर्चा आणि अन्य संसदीय कामकाजावरही परिणाम झाला. विरोधकांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विरोधात घोषणाबाजी करत इंधन संकट आणि घरगुती गॅसच्या वाढत्या दरांचा मुद्दाही उपस्थित केला. संसदेच्या परिसरात फलक आणि बॅनर दाखवत त्यांनी सरकारविरोधात निषेध नोंदवला. दरम्यान, या परिस्थितीवर प्रतिक्रिया देताना अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे देशासमोर काही आर्थिक आव्हाने निर्माण झाल्याचे नमूद केले. सरकार परिस्थितीवर लक्ष ठेवून असून अर्थव्यवस्था स्थिर ठेवण्यासाठी आवश्यक उपाययोजना केल्या जात असल्याचे त्यांनी सांगितले. अशा संवेदनशील काळात विरोधकांनी सहकार्य करणे अपेक्षित असताना ते बेजबाबदार वर्तन करत असल्याची टीकाही त्यांनी केली.

COMMENTS