Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

जल जीवन मिशनचा ’राजगड तांड्यात’ बोजवारा; ’श्री दत्त कन्स्ट्रक्शन’ला काळया यादीत टाकण्याचे मंत्रालयाचे आदेश

किनवट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ’जल जीवन मिशन’ योजनेला किनवट तालुक्यातील राजगड तांडा येथे भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. य

ऊस बिलासाठी जिल्हाधिकारी कार्यालय नव्हे तर काँग्रेस भवन समोर शेतकऱ्यांचा ठिय्या…
गणेश विसर्जन करताना 11 जणांना बसला विजेचा शॉक
राहुरीमध्ये तुतारी विरूद्ध घडयाळीचा सामना

किनवट : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाकांक्षी ’जल जीवन मिशन’ योजनेला किनवट तालुक्यातील राजगड तांडा येथे भ्रष्टाचाराची वाळवी लागली आहे. येथील नळ पाणी पुरवठा योजनेत मोठ्या प्रमाणात अनियमितता झाल्याची तक्रार प्राप्त होताच, महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. संबंधित कामाची चौकशी करून दोषी ’श्री दत्त कन्स्ट्रक्शन कंपनी’ला काळया यादीत समाविष्ट करण्याचे निर्देश मंत्रालयाने दिले आहेत.
ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष नवीन जाधव यांनी राजगड तांडा येथील पाणी पुरवठा योजनेच्या कामात निकृष्ट दर्जा आणि अनियमितता झाल्याची तक्रार शासनाकडे केली होती. या तक्रारीची दखल घेत मंत्रालयातील कक्ष अधिकारी प्रसाद स्वामी यांनी दि. 1 डिसेंबर 2025 रोजी जल जीवन मिशनचे अभियान संचालक आणि नांदेड जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकार्‍यांना चौकशीचे आदेश दिले होते. दिनांक 23 फेब्रुवारी 2026 रोजी प्रशासकीय पथकाने राजगड तांडा येथे भेट देऊन प्रत्यक्ष स्थळ पाहणी केली. या पाहणी दरम्यान अत्यंत धक्कादायक बाबी उघडकीस आल्या आहेत: गावातील काही भागात पाणीच पोहोचत नाही, तर काही भागात अत्यंत कमी दाबाने पाणी येते, नळ जोडणी करताना आवश्यक असलेले ’फेरोल’ अनेक ठिकाणी जोडले नसल्याचे निदर्शनास आले आहे, गावातील वितरण पाइपलाइनचे काम पूर्ण न झाल्यामुळे अनेक घरांना नळ जोडणीपासून वंचित राहावे लागले आहे तर योजनेअंतर्गत विहीर खोलीकरण मंजूर असतानाही अद्याप विहिरीचे कोणतेही काम करण्यात आलेले नाही. या स्थळ पाहणीच्या वेळी ग्रामविकास अधिकारी, सरपंच, तक्रारदार नवीन जाधव आणि ग्रामस्थ उपस्थित होते. या अहवालामुळे कंत्राटदार कंपनीचे धाबे दणाणले आहेत. सरकारी निधीचा अपहार करून जनतेला तहानलेले ठेवणार्‍या ’श्री दत्त कन्स्ट्रक्शन’वर आता कोणती कारवाई होते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

COMMENTS