Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उर्सात बनावट नोटा चालविण्याचा प्रयत्न फसला; 19 हजार 500 रुपयांच्या नोटा जप्त

माहूर : शहरातील सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून माहूर पोलिसांनी केलेल

जिल्ह्यात आठवडाभर पुरेल एवढाच गॅसचा साठा!व्यावसायिक गॅसचा तुटवडा; खानावळी, हॉटेलचालक  संकटात, विद्यार्थ्यांच्या जेवणावर प्रश्नचिन्ह
युद्धजन्य परिस्थितीमुळे नांदेड शहरांमध्ये हॉटेल, वस्तीगृहे यामध्ये व्यावसायिक सिलेंडरचा तुटवडा; विद्यार्थी संख्येवर परिणाम होण्याची शक्यता
नांदेड-लातूर थेट रेल्वे मार्गाच्या पुढील कार्यवाहीला लवकरच गती!; खा. अशोकराव चव्हाण यांची माहिती

माहूर : शहरातील सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेदरम्यान बनावट नोटा चलनात आणण्याचा प्रयत्न उघडकीस आला असून माहूर पोलिसांनी केलेल्या कारवाईत एकूण 19 हजार 500 रुपयांच्या बनावट नोटा जप्त करण्यात आल्या आहेत. या प्रकरणी एका व्यक्तीस ताब्यात घेण्यात आले असून एका विधीसंघर्षित अल्पवयीन मुलाचा सहभाग समोर आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दि. 10 मार्च रोजी रात्री सुमारे 10 वाजण्याच्या सुमारास माहूर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी संग्राम पवार, गजानन जाधव व राठोड हे सोनापिर बाबा दर्गाह येथे सुरू असलेल्या उर्स यात्रेत पायी गस्त घालत होते. यावेळी क्रॉस झुल्याजवळील तिकीट काउंटरवर कार्यरत असलेल्या महिलेने एका मुलाकडून बनावट 500 रुपयांची नोट देऊन तिकीट घेण्याचा प्रयत्न केल्याची माहिती पोलिसांना दिली. या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ त्या मुलास ताब्यात घेऊन चौकशी केली असता तो माहूर येथील वार्ड क्रमांक 7 मधील रहिवासी असल्याचे समोर आले. त्याची अंगझडती घेतली असता त्याच्याकडून 500 रुपयांच्या 6 बनावट नोटा, एकूण 3 हजार रुपये जप्त करण्यात आले. पुढील चौकशीत या बनावट नोटा त्याने आपल्या आत्याच्या पतीच्या घरातून आणल्याचे सांगितले. त्यानुसार वरिष्ठांच्या आदेशावरून पोलिसांनी पंचांसमक्ष संबंधित घराची झडती घेतली. झडतीदरम्यान घरातील रॅकमधील कपड्याखाली 500 रुपयांच्या आणखी 33 बनावट नोटा, एकूण 16 हजार 500 रुपये किंमतीच्या नोटा आढळून आल्या. पोलिसांनी पंचनामा करून सर्व बनावट नोटा जप्त केल्या असून एकूण 39 बनावट नोटा, 19 हजार 500 रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. या प्रकरणी भारतीय न्याय संहिता कलम 179 व 180 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई उपविभागीय पोलीस अधिकारी किरण कुमार भोंडवे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक देविदास चोपडे यांनी केली. पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद घोडके यांच्या नेतृत्वाखाली पोलीस कर्मचारी लक्ष्मण मेश्राम, संग्राम पवार, संघरत्न सोनसाळे तसेच होमगार्ड शेख गणी, दिलीप जाधव, पंकज मुरकुटे, उमेश भगत व एस. पी. भगत करीत आहेत.

COMMENTS