Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

बुलेटस्वारांवर कारवाईचा बडगा; कर्णकर्कश सायलेन्सरवर आष्टी पोलिसांची धडक कारवाई

कडा : आष्टी शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्णकर्कश आवाज करणार्‍या बुलेट दुचाकींमुळे नागरिक हैराण झाले होते.सुसाट वेगात धावणार्‍या तसेच मॉडिफाईड

विखे पाटील फाउंडेशनचे दिव्यांगासाठीचे कार्य अतुलनीय  : भांगरे
महिलांसह नागरिकांच्या तात्काळ सुरक्षेसाठी रक्षक दल; संगमनेर नगरपरिषदेचा निर्णय ; महाराष्ट्रात प्रथमच रक्षकदल कार्यान्वित
भर बाजारात कमानीचा स्लॅप कोसळला; चार महिला बालंबाल बचावल्या

कडा : आष्टी शहरात गेल्या काही दिवसांपासून कर्णकर्कश आवाज करणार्‍या बुलेट दुचाकींमुळे नागरिक हैराण झाले होते.सुसाट वेगात धावणार्‍या तसेच मॉडिफाईड सायलेन्सर लावलेल्या बुलेटमुळे महिला,मुली,लहान बालके आणि वृद्ध नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत होता. या गंभीर समस्येची दखल घेत आष्टी पोलिसांनी शहरात विशेष मोहीम राबवत बुलेटस्वारांवर कडक कारवाई केली.
आष्टी शहरासह तालुक्यात ठिकठिकाणी कर्कश हॉर्न आणि अनधिकृत सायलेन्सरमुळे ध्वनिप्रदूषणात लक्षणीय वाढ झाली होती. रस्त्यावरून बुलेट जाताच कानठळ्या बसाव्यात असा आवाज येत असल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत होती. या पार्श्वभूमीवर आष्टी पोलिसांनी शहरात कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर व अनधिकृत हॉर्न लावलेल्या वाहनांविरोधात विशेष मोहीम हाती घेतली. या कारवाई दरम्यान 4 बुलेट चालकांवर कारवाई करण्यात आली.त्यांच्या वाहनांवरील कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर जप्त करण्यात आले. तसेच इतर काही वाहनांवरही दंडात्मक कारवाई करून चालकांकडून एकूण 10 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला.या कारवाईमुळे शहरातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक नवनीत कॉवत, उपविभागीय पोलीस अधिकारी हानपुडे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आष्टी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांच्या आदेशाने ट्रॅफिक पोलिस अंमलदार सचिन क्षीरसागर व नागेशराव लोमटे यांनी केली.त्यांनी कर्णकर्कश आवाज करणारे सायलेन्सर काढून मोटार वाहन कायद्यानुसार दंडात्मक कारवाई केली.
बुलेटस्वारांनो सावधान! पोलिस अँक्शन मोडमध्ये
यापुढे कोणीही बुलेटला अनधिकृत व कर्णकर्कश सायलेन्सर लावू नये, अन्यथा यापेक्षाही कडक कारवाई करण्यात येईल, असा इशारा पोलीस निरीक्षक शरद भुतेकर यांनी दिला आहे. या कारवाईमुळे बुलेट चालकांमध्ये घबराटीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी मात्र पोलिसांच्या कारवाईचे स्वागत केले आहे.

COMMENTS