Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उप अभियंता सतीश आंबवडेंचे नवे प्रताप समोर; हॉटेल सद्गुरूमध्ये दमबाजी करत स्वीकारला कुर्ला येथील पदभार

मुंबई : सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्ला येथे कार्यरत असणारे उपअभियंता सतीश रामचंद्र आंबवडे यांचे नव-नवे प्रताप समोर येत आहे. बीडीडी चाळ, जे.जे.

खेलो इंडिया युवा स्पर्धा; अ‍ॅथलेटिक्समध्ये मुलींना विजेतेपद रिलेसह तीन सुवर्ण, एक कांस्यपदक
जायनावाडी बिताका गावात राबवली स्वच्छता मोहीम
भाजपमध्ये गेल्याने विखेंना येते शांत झोप..पालकमंत्री मुश्रीफांनी लगावला टोला
The current image has no alternative text. The file name is: Satish-Ambawade-News-e1773209876386.jpg

मुंबई : सार्वजनिक बांधकाम उपविभाग कुर्ला येथे कार्यरत असणारे उपअभियंता सतीश रामचंद्र आंबवडे यांचे नव-नवे प्रताप समोर येत आहे. बीडीडी चाळ, जे.जे. रूग्णालयातील भ्रष्टाचाराचे प्रकरण ताजे असतांनाच आंबवडे यांनी चेंबूर येथील हॉॅटेल सद्गुरूमध्ये तत्कालीन उप अभियंता सोनार यांना दमबाजी करून हा पदभार त्यांनी ताब्यात घेतला.
आंबवडे यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात नियमबाह्य कामांचा धडाका लावला असून बीडीडी चाळ येथे व्यवस्थापक तथा उप अभियंता म्हणून कार्यरत असतांना तब्बल 30 कोटींचा गैरव्यवहार केला असतांनाच दुसरीकडे त्यांनी कुर्ला येथील पदभार स्वीकारण्यापूर्वी मोठी आर्थिक देवाण-घेवाण केल्याची चर्चा सुरू आहे. त्याचवेळी कुर्ला येथील उपविभागाचा पदभार स्वीकारण्याची आंबवडे यांनी मोठी घाई केली. त्यासाठी त्यांनी तेथील कार्यरत असणारे उपअभियंता सोनार यांना दमबाजी करत, हा पदभार तात्काळ स्वीकारला. त्यामुळे आंबवडे यांच्या या कार्यप्रणावीवर संशय येत असून त्यांच्या या संपूर्ण कार्यकाळाची चौकशी करण्याची मागणी होत आहे.
उप अभियंता सतीश आंबवडे यांनी कुर्ला उपविभागात नियमबाह्य कामांचा धडाका लावला असून, त्यांनी याच उपविभागातील शाखा अभियंता हेमंत जाधव, आकाश लड्डा, तुषार व्हटकर आणि रमेश त्रिमुखे या शाखा अभियंत्यांना मानसिक त्रास देत त्यांनी कुठल्याही देयकांवर सही करू नये, यासाठी मज्जाव केला आहे. या चारही शाखा अभियंत्यांना दमबाजी करत आंबवडे यांनी नियमबाह्य कामकाजांचा धडाका लावला आहे. उप अभियंता आंबवडे यांचा एकीकडे कोट्यावधींचा भ्रष्टाचार सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांची याच उपविभागात एकाधिकारशाही सुरू आहे. त्यांच्या या दंडेलशाही आणि एकाधिकारशाही कारभाराला त्यांचेच सहकारी अधिकारी आणि कर्मचारी वैतागले आहेत. त्यामुळे आंबवडे यांची चौकशी करण्याची मागणी होत आहे.

आंबवडेंना अभय देणारा ‘गॉडफादर’ कोण ?
एक उपअभियंता पदावर कार्यरत असणारे सतीश आंबवडे बीडीडी चाळ येथे व्यवस्थापक तथा उपअभियंता पदावर कार्यरत असतांना 30 कोटींचा गैरव्यवहार करतो, तसेच जे.जे. रूग्णालयातील कामांमध्येही संगनमताने गैरव्यवहार करतो, या बाबी तपासता आंबवडे यांचा गॉडफादर कोण ? इतका मोठा गैरव्यवहार करूनही त्यांना अभय देणारा हा गॉडफादर कोण? असा सवाल उपस्थित होत आहे.

आंबवडे पबजीसोबत ‘आय-टम’ खेळण्यात मास्टर
उप अभियंता असलेले सतीश आंबवडे कायमच कलीना उपविभागात हजर नसतात. त्यामुळे सरकारी कामाचा खोळंबा होत असतांना दुसरीकडे आंबवडे कायमच चेंबूर रेशनिंग कार्यालयातील सेवाकेंद्र असलेल्या चौकीत बसून सतत पबजी खेळण्यात मग्न असतात. तसेच संध्याकाळी पबजीसोबत ‘आय-टम’ कोण-कोणते खेळतात, अशी चर्चा या उपविभागात चांगलीच रंगतांना दिसून येत आहे.


बीडीडी चाळीतील खोली विक्रीमध्ये घेतली लाच
बीडीडी चाळीतील खोल्या विक्रीमध्ये उपअभियंता सतीश आंबवडे यांनी मोठ्या प्रमाणावर लाच घेतली. प्रत्यक्षात राज्य सरकारने 2021 मध्ये काढलेल्या शासन निर्णयानुसार बीडीडी चाळीत राहणार्‍या पोट भाडेकरू असणार्‍या खोल्या सील करण्यात आल्या होत्या. त्याच खोल्या आंबवडे यांनी संबंधितांकडून लाच घेत मोठा गैरव्यवहार करत या खोल्या पूर्ववत केल्या. त्याचा सविस्तर वृत्तांत उद्याच्या अंकात

COMMENTS