Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अक्षय कर्डिलेंची बदनामी करणाऱ्याचा छडा लावावा; अन्यथा आंदोलन ; भाजप कार्यकर्त्यांचा उपोषणाचा इशारा

पाथर्डी : जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून कर्डीले यांची बदनामी करणाऱ्या आरोपीचा तातडीने छडा लावावा अन्यथा आंदोलन करण्याच्या इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. या संदर्भात नगराध्यक्ष अभय आव्हाड,काशिनाथ पाटील लवांडे,बाळासाहेब अकोलकर,पुरषोत्तम आठरे,सचिन वायकर,संतोष शिंदे,मुकुंद गर्जे,वैभव खलाटे,अजय रक्ताटे,जिजाबापू लोंढे,अरुण रायकर,धीरज मैड,गणेश पालवे,रवींद्र वायकर,बबलू खोर्दे आदींनी पोलिसांना निवेदन दिले. दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर कर्डिले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी  तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी. येत्या चार दिवसात आरोपीला अटक केली नाही तर पाथर्डी पोलीस स्टेशन समोर १३  मार्च रोजी भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसतील असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.                                                                    या वेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, चार दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी कसा सापडत नाही. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक काही दिवसात लागणार असल्याने जाणीवपूर्वक  कर्डिले यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. हे षडयंत्र कोणी रचले याचा पोलिसांनी शोध घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

शेवगाव सायकल असोसिएशनतर्फे गुणवंत महिलांचा सन्मान
कृषी संकल्प उत्तम; पण ‘कायाकल्प किती होणार’? : डॉ. मुळीक 
धानोरे घाटावर ‘शिवतीर्थ’ साकारअहिल्यानगर जिल्ह्यात पहिलेच स्थळ

पाथर्डी : जिल्हा सहकारी बँकेचे संचालक अक्षय कर्डिले यांच्या विषयी सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट व्हायरल करून कर्डीले यांची बदनामी करणाऱ्या आरोपीचा तातडीने छडा लावावा अन्यथा आंदोलन करण्याच्या इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे. या संदर्भात नगराध्यक्ष अभय आव्हाड,काशिनाथ पाटील लवांडे,बाळासाहेब अकोलकर,पुरषोत्तम आठरे,सचिन वायकर,संतोष शिंदे,मुकुंद गर्जे,वैभव खलाटे,अजय रक्ताटे,जिजाबापू लोंढे,अरुण रायकर,धीरज मैड,गणेश पालवे,रवींद्र वायकर,बबलू खोर्दे आदींनी पोलिसांना निवेदन दिले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, दोन दिवसापूर्वी सोशल मीडियावर कर्डिले यांना बदनाम करण्याचा प्रयत्न झाला आहे.या प्रकरणातील आरोपीचा पोलिसांनी  तात्काळ शोध घेऊन त्याच्यावर कठोर कारवाई करावी. येत्या चार दिवसात आरोपीला अटक केली नाही तर पाथर्डी पोलीस स्टेशन समोर १३  मार्च रोजी भाजपाचे सर्व कार्यकर्ते उपोषणाला बसतील असा इशारा निवेदनाच्या शेवटी देण्यात आला आहे.                                                                   

या वेळी बोलताना आव्हाड म्हणाले की, चार दिवस उलटूनही पोलिसांना आरोपी कसा सापडत नाही. राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाची पोटनिवडणूक काही दिवसात लागणार असल्याने जाणीवपूर्वक  कर्डिले यांना बदनाम करण्याचे षडयंत्र रचले गेले आहे. हे षडयंत्र कोणी रचले याचा पोलिसांनी शोध घ्यावा अन्यथा उग्र आंदोलन छेडण्याचा इशारा आव्हाड यांनी दिला आहे.

COMMENTS