Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

कर्जमाफीबद्दल स्वागत पण अतिशर्ती कोणत्या? किसान सभेचा सवाल

बीड : अखिल भारतीय किसान सभेने मागील वर्षांपासून कर्जमाफीबद्दल नागपूर, मुंबई येथे हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांचा लाँग मार्च काढून मागणी लावून धर

घरकुल हप्त्यांवर प्रशासनाची दिरंगाई
स्वच्छ, सुंदर बीडसाठी आ. विजयसिंह पंडित यांचा पुढाकार!
बीडचा पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी आ. विजयसिंह पंडित थेट फिल्डवर

बीड : अखिल भारतीय किसान सभेने मागील वर्षांपासून कर्जमाफीबद्दल नागपूर, मुंबई येथे हजारोंच्या संख्येने शेतकर्‍यांचा लाँग मार्च काढून मागणी लावून धरली होती. नुकत्याच संपन्न झालेला अर्थ संकल्पात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी 2 लाख रुपयांची कर्जमाफी घोषित केली मात्र त्यामागील स्पस्टता अद्याप ही सर्वसामान्यांसमोर आली तेव्हा सरकारने केलेल्या कर्जमाफीचे स्वागत मात्र त्यामागील असलेल्या अतिशर्ती कोणत्या ह्या पण जाहीरपणे उघड करण्यात याव्यात असे मत राज्य किसान सभेचे उपाध्यक्ष कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी व्यक्त केले.
राज्य सरकारने नुकताच संपन्न झालेल्या अर्थ संकल्पात 2 लाख रु पर्यन्तची कर्जमाफी जाहीर केली मात्र किसान सभेने 30 जून 2026 पर्यंतची कर्जमाफी करावी अशी मागणी लावून धरली असताना सरकारने सप्टेंबर 2025 अखेर पर्यन्त 2 लाख रुपयांची कर्जमाफी देण्याचे जाहीर केले. सरकारच्या या निर्णयाने मराठवाड्यातील अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना या कर्जमाफीपासून वंचीत रहावे लागणार आहे. नियमितपणे कर्ज परतफेड करणार्‍या शेतकर्‍यांना देखील प्रोत्साहन अनुदान म्हणून 50 हजार रुपयांची बोळवण सरकारने जाहीर केली या सर्व घोषणा करत असताना अति आणि शर्ती लागू केल्याने ह्या अति शर्ती कोणत्या ह्या देखील सरकारने जाहीर कराव्यात जेणे करून सरकारची कर्जमाफीची वस्तुस्थिती सर्वसामान्य शेतकर्‍यांना समजेल असे मत कॉ.ऑड.अजय बुरांडे यांनी कर्जमाफी संदर्भात व्यक्त केले.

COMMENTS