Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

अनिल अंबानी समूहाशी संबंधित कंपन्यांवर ईडीचे छापे

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मुंबई आणि हैदराबाद येथे एकाचवेळी छापेमारी

अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँकेने 500 कोटींच्या ठेविचा टप्पा ओलांडत 5 कोटी रुपयांचा मिळवला करपूर्व नफा
जिल्हास्तरीय ‘स्पेलिंग बी’ स्पर्धा विजेत्यांना पालकमंत्री दादाजी भुसे यांच्या हस्ते पारितोषिक वितरण संपन्न
नवरी पळून गेल्याने नवऱ्याचे आंदोलन

नवी दिल्ली : उद्योगपती अनिल अंबानी यांच्या समूहाशी संबंधित कंपन्यांवर अंमलबजावणी संचालनालयाने शुक्रवारी मुंबई आणि हैदराबाद येथे एकाचवेळी छापेमारी केली. आर्थिक गैरव्यवहार आणि संशयास्पद व्यवहारांच्या चौकशीच्या पार्श्‍वभूमीवर ही कारवाई करण्यात आली असल्याची माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, अनिल अंबानी यांच्या समूहातील रिलायन्स पॉवर या कंपनीसह काही संबंधित संस्थांच्या व्यवहारांची चौकशी सुरू आहे. या तपासाचा भाग म्हणून ईडीच्या सुमारे पंधरा पथकांनी दोन्ही शहरांमधील विविध ठिकाणी धाड टाकली. मुंबई आणि हैदराबादमधील सुमारे दहा ते बारा ठिकाणी ही कारवाई करण्यात आली. यात संबंधित कंपन्यांची कार्यालये, काही अधिकार्‍यांची निवासस्थाने तसेच इतर संबंधित ठिकाणांचा समावेश असल्याचे सांगितले जाते. छापेमारीदरम्यान अधिकार्‍यांनी विविध कागदपत्रे, आर्थिक व्यवहारांच्या नोंदी आणि तपासासाठी महत्त्वाची ठरू शकणारी कागदपत्रे ताब्यात घेतली. बँक व्यवहारांशी संबंधित कथित गैरव्यवहार आणि आर्थिक अनियमितता यांची चौकशी ईडीकडून सुरू आहे. या संदर्भात अनिल अंबानी यांच्या समूहातील विविध कंपन्यांच्या आर्थिक व्यवहारांचा सखोल तपास करण्यात येत असल्याचेही सूत्रांनी स्पष्ट केले. संशयास्पद व्यवहारांचा मागोवा घेण्याचा प्रयत्न तपास यंत्रणा करत आहे. या छापेमारीमुळे अनिल अंबानी समूहाच्या आर्थिक व्यवहारांबाबतचा तपास आणखी वेगाने पुढे जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. तपास पूर्ण झाल्यानंतरच या प्रकरणातील पुढील कारवाईबाबत स्पष्ट चित्र समोर येणार आहे.

COMMENTS