Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयाचा विद्यार्थी यश गित्ते याची ‘इन्स्पायर अवॉर्ड’साठी निवड

अंबाजोगाई । प्रतिनिधीयेथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 9 वीचा विद्यार्थी यश सिद्धेश्वर गित्ते याच्या विज्ञान प्रयोगाची इन्स्पायर अ

पाण्याचे नियोजन व्हावे
ट्रकच्या केबिनमध्ये येणार एसी
मुंबई महापालिकेची लढाई भाजपने जिंकली! ; स्थायी समितीतून काढण्याचा शिवसेनेचा निर्णय रद्द
Displaying 26.jpg

अंबाजोगाई । प्रतिनिधी
येथील श्री खोलेश्वर माध्यमिक विद्यालयातील इयत्ता 9 वीचा विद्यार्थी यश सिद्धेश्वर गित्ते याच्या विज्ञान प्रयोगाची इन्स्पायर अवॉर्डच्या प्राथमिक फेरीसाठी निवड झाली आहे. शैक्षणिक वर्ष 2025-26 साठी भारत सरकारच्या विज्ञान व तंत्रज्ञान विभाग (ऊडढ) मार्फत राबविण्यात येणार्‍या या प्रतिष्ठित विज्ञान उपक्रमासाठी त्याची निवड झाल्याने विद्यालयात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.
या स्पर्धेसाठी यश गित्ते याला विद्यालयातील इन्स्पायर अवॉर्ड प्रमुख नंदिनी कोदरकर तसेच सर्व विज्ञान शिक्षकांनी मार्गदर्शन केले. विद्यार्थ्याने मिळविलेल्या या यशाबद्दल भारतीय शिक्षण प्रसारक संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुरेंद्र अलुरकर, संस्था कार्यवाह डॉ. हेमंत वैद्य, मुख्य प्रशासकीय समन्वयक प्रा. चंद्रकांत मुळे, श्री खोलेश्वर शैक्षणिक संकुलातील केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, स्थानिक समन्वय समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल देशपांडे, कार्यवाह किरण कोदरकर, माध्यमिक शालेय समितीचे अध्यक्ष अविनाश मुडेगांवकर, शालेय समितीचे सदस्य, विद्यालयाचे मुख्याध्यापक अनंतराम कोपले, उपमुख्याध्यापक शैलेंद्र कंगळे, पर्यवेक्षक सुर्यकांत उजगरे, पर्यवेक्षिका रूपाली मुळे, अभ्यासपूरक मंडळ प्रमुख श्रीकांत देशपांडे, ज्योती शिंदे, प्रमुख नंदिनी कोदरकर, तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचार्‍यांनी त्याचे अभिनंदन केले.

COMMENTS