Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

लिंबागणेश येथे गुलाल मुक्त ,डीजेमुक्त शिवजयंती!पारंपरिक लेझीम-ढोल ताशांच्या गजरात लक्ष्यवेधी मिरवणूक

लिंबागणेश । प्रतिनिधीबीड तालुक्यातील बालाघाटावरील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावन भूमीत लिंबागणेश येथे डीजेच्या कानठळ्या बसवणार्‍या गोंगाटाला

साखर झोपेत असलेल्या चौघांचा आगीत होरपळून मृत्यू
ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही
जामखेडमधील अतिक्रमण, महामार्ग प्रश्नावर प्रशासन अलर्ट; सभापती राम शिंदे यांनी घेतला आढावा; जिल्हाधिकाऱ्यांसह बैठक
Displaying 11.jpg

लिंबागणेश । प्रतिनिधी
बीड तालुक्यातील बालाघाटावरील श्रीक्षेत्र भालचंद्र गणपतीच्या पावन भूमीत लिंबागणेश येथे डीजेच्या कानठळ्या बसवणार्‍या गोंगाटाला पूर्णविराम देत आणि रासायनिक आणि बनावट गुलाल त्वचेसाठी हानीकारक असल्याने गुलालाचे दुष्परिणाम टाळण्यासाठी गुलाल मुक्त  पारंपरिक वाद्यांच्या निनादात सार्वजनिक शिवजयंती उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला.
दि.05 गुरुवारी सायं. 5 वाजता भालचंद्र माध्यमिक विद्यालय येथून मिरवणुकीला प्रारंभ झाला. आकर्षक फुलांनी सजवलेल्या रथातून विराजमान असलेली छत्रपती शिवाजी महाराज यांची देखणी मूर्ती सर्वांचे लक्ष वेधून घेत होती. घोड्यावर विराजमान राजमाता जिजाऊ, छत्रपती शिवाजी महाराज व छत्रपती संभाजी महाराज यांचा जिवंत आकर्षक देखावा आणि डीजेमुक्त,  गुलाल मुक्त, शिस्तबद्ध आणि पारंपरिक पद्धतीने काढण्यात आलेली ही मिरवणूक ग्रामस्थांसाठी विशेष आकर्षण ठरली. प्रा . सचिन वाणी सरांच्या मार्गदर्शनात भालचंद्र माध्यमिक विद्यालयाच्या विद्यार्थी-विद्यार्थिनींनी सादर केलेले लेझीम नृत्य आणि त्याला लाभलेली ढोल-ताशांची दमदार साथ उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडणारी ठरली. तरुणांनी दाखवलेला संयम, शिस्त आणि सांस्कृतिक बांधिलकी हेच या सोहळ्याचे खरे वैशिष्ट्य मानले जात आहे. अवाजवी खर्च टाळून मूळ परंपरेचे जतन करण्याचा निर्धार ग्रामस्थांनी प्रत्यक्ष कृतीतून दाखवून दिला. लहानांपासून ज्येष्ठांपर्यंत सर्वांचा उत्स्फूर्त सहभाग मिरवणुकीत दिसून आला. मिरवणुकीच्या प्रमुख मार्गावर महिलांनी पारंपरिक पद्धतीने रांगोळी काढून स्वागत केले, त्यामुळे संपूर्ण गावात उत्सवी आणि संस्कृतीप्रधान वातावरण निर्माण झाले. डीजेमुक्त, शिस्तबद्ध आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ही शिवजयंती लिंबागणेशकरांसाठी अभिमानाची ठरली.

COMMENTS