Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ज्येष्ठ पत्रकार बिपिनराव गायकवाड यांचे निधन

कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे कोपरगाव कार्याध्यक्ष पत्रकार बिपिनराव  गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

पंकजा मुंडे यांनी शिर्डीत येऊन घेतले साई समाधीचे दर्शन
शिळवंडीत क्रांतीसुर्य राघोजी भांगरे यांचा स्मृतीदिन उत्साहात
हॉटेल चालकांचा प्रामाणिकपणा, हॉटेलमध्ये विसरलेले ५ तोळे सोन्यासह २० हजाराची रोख रक्कम केली परत

कोपरगाव शहर : महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ मुंबईचे कोपरगाव कार्याध्यक्ष पत्रकार बिपिनराव  गायकवाड यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या अकस्मात जाण्याने पत्रकारिता क्षेत्रात शोककळा पसरली आहे. बिपिनराव गायकवाड यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत प्रामाणिक व निर्भीड पत्रकारितेची परंपरा जपली. महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ, मुंबई व महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ तसेच महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ कोपरगाव तालुका व शहर यांच्या वतीने त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. अत्यंत शोकाकुल वातावरणात जेऊर कुंभरी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.

COMMENTS