Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

पाणीपट्टीवाढीचा निषेध; आज देवळाली प्रवरा नगरपरिषदेवर सर्वपक्षीय मोर्चा

 देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरात पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून नगरपरिषदेविरोधात सर्व

महामानव डॉ.आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्वपक्षीयांकडून अभिवादन..
पतीने झोपेतच केली पत्नी आणि सासूची हत्या
दीपक करगळ यांची 5 हजार किलो आंब्यांची साई प्रसालयात देणगी

 देवळाली प्रवरा : देवळाली प्रवरा शहरात पाणीपट्टी दरवाढीच्या निर्णयाविरोधात नागरिकांमध्ये तीव्र संतापाची लाट उसळली असून नगरपरिषदेविरोधात सर्वपक्षीय आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. नगरपरिषदेने पाणीपट्टी १८०० रुपयांवरून थेट ३००० रुपये करण्याचा घेतलेला निर्णय मागे घ्यावा, या मागणीसाठी येत्या ६ मार्च २०२६ रोजी नगरपरिषदेवर धरणे मोर्चा काढण्यात येणार आहे.

नगरपरिषदेच्या २८ जानेवारी रोजी झालेल्या सर्वसाधारण सभेत विषय क्रमांक २० अंतर्गत पाणीपट्टी दरवाढीचा निर्णय मंजूर करण्यात आला. नागरिकांना विश्वासात न घेता तसेच विरोधी सदस्यांचा विरोध डावलून हा निर्णय घेतल्याचा आरोप होत असून शहरात या निर्णयाविरोधात तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. दरवाढ रद्द करण्यासाठी सर्वपक्षीय पातळीवर आंदोलन उभारण्यात आले आहे.

दरम्यान, नगरसेवक संतोष चोळके यांनी नगराध्यक्षांवर टीका करत, “मगरूर नगराध्यक्षांनी पाणीपट्टी कमी करावी, अन्यथा तीव्र मोर्चा काढला जाईल,” असा इशारा दिला आहे. तर नगरसेवक भिमराज उर्फ दासू पठारे यांनी संताप व्यक्त केला. नगराध्यक्ष सत्यजित कदम यांच्या घरी काम करणाऱ्या महिलेचा पगार नगरपालिकेच्या आरोग्य विभागातून दिला जात असल्याचा आरोप सुरेंद्र थोरात यांनी केला आहे. या आरोपांमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.

आरपीआयचे जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात,शिव

COMMENTS