Homeताज्या बातम्यादेश

देशभरात 3 मार्च रोजी खंडग्रास चंद्रग्रहण

मुंबई ः यंदा जगभरात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होणार असली तरी भारतातून 3 मार्च 2026 रोजी केवळ एकच चंद्रग्रहण पाहता येणार आहे. अरुणाचल प्र

भालगावातील जमीन मोजणी प्रकरणी वाद; हद्दीखुणांमध्ये तफावत; भूमीअभिलेख अधिकाऱ्यांवर शेतकऱ्यांचा आरोप
अखेर संपत सूर्यवंशी यांचा बनावट प्रस्ताव प्रकरणाचा कबुलीजबाब l पहा LokNews24
ना.धनंजयजी मुंडे यांच्या वाढदिवसा निमित्त रंगभरण स्पर्धा उत्साहात संपन्न

मुंबई ः यंदा जगभरात दोन सूर्यग्रहणे आणि दोन चंद्रग्रहणे होणार असली तरी भारतातून 3 मार्च 2026 रोजी केवळ एकच चंद्रग्रहण पाहता येणार आहे. अरुणाचल प्रदेशात खग्रास, तर महाराष्ट्रात खंडग्रास स्वरूपात हे ग्रहण दिसेल, अशी माहिती ज्येष्ठ खगोल अभ्यासक आणि ‘स्काय वॉच ग्रुप’चे अध्यक्ष प्रा. सुरेश चोपणे यांनी दिली.
भारतामध्ये दुपारी 3.20 वाजता खंडग्रास ग्रहणाची सुरुवात होईल. सायंकाळी 4.34 वाजता खग्रास अवस्था सुरू होऊन 5.32 वाजता ती समाप्त होईल. मात्र या वेळेत अनेक भागांत चंद्र अदृश्य असल्याने ग्रहण प्रत्यक्ष पाहता येणार नाही. अरुणाचल प्रदेशातून खग्रास अवस्था स्पष्ट दिसेल. कोलकाता येथे सुमारे 90 टक्के, गडचिरोली येथे 30 टक्के, चंद्रपूर व नागपूर येथे सुमारे 25 टक्के, पुण्यात 10 टक्के, तर मुंबईत अवघे 1 टक्के खंडग्रास ग्रहण दिसेल. विदर्भात सायंकाळी 6.18 ते 7.33 या दरम्यान अल्प स्वरूपाचे ग्रहण अनुभवता येईल. हे ग्रहण पाकिस्तान, अफगाणिस्तान तसेच भारतासह पूर्वेकडील आशियाई देश, ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका येथेही दिसणार आहे. यापूर्वी 17 फेब्रुवारी रोजी काही देशांत कंकणाकृती सूर्यग्रहण झाले होते. पुढे 12 ऑगस्ट रोजी खग्रास सूर्यग्रहण, तर 28 ऑगस्ट रोजी खंडग्रास चंद्रग्रहण होणार आहे.

राज्यात 1 तास 35 मिनिटे दिसेल चंद्रग्रहण
महाराष्ट्रात सुमारे एक तास पस्तीस मिनिटेच ग्रहणाचा अंश दिसेल. चंद्र पूर्व क्षितिजावर असल्याने दृश्य फार उठावदार नसेल. मोकळ्या जागेत किंवा टेकडीवरून निरीक्षण केल्यास अनुभव अधिक स्पष्ट मिळू शकतो. दुर्बिणीतून फारसा फरक जाणवत नसल्याने साध्या डोळ्यांनीही ग्रहण पाहता येते. ग्रहणे ही पूर्णतः वैज्ञानिक घटना असून त्यांचा अभ्यास वैज्ञानिक दृष्टीकोनातूनच करावा, असे आवाहन प्रा. सुरेश चोपणे यांनी केले.

COMMENTS