Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

प्रशासनाविरुद्ध सर्वपक्षीय एकवटले; आज जामखेड बंद 

गरिबांचे अतिक्रमण काढले; धनदांडग्यासमोर नमले?  जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी २६ फेब्रुवारीपासून सर्वपक्षीयांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.  अतिक्रमणाबाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत जामखेड शहर बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे. वेळोवेळी दोन वर्षापासून निवेदन लेखी तोडी सांगून पाठपुरावा केला संबधित प्रशासनाने कसलीही दाखल घेतली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दि. २४ फेब्रुवारीपासून अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले असून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून रस्त्याच्या कामालाही मोठा विलंब होत असल्याने नागरिक, व्यापारी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.दरम्यान, मुख्याधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत. ठेकेदार बिल नेमके कोणाकडून काढत आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. आमदार रोहित पवार व सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रकरणात लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा देत सर्व व्यापारी, नागरिक व ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे यावेळी अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक प्रा.विकी घायतडक, ऍड.अरुण जाधव, शहाजी राळेभात, अझहरभाई काझी, संभाजी राळेभात, विकास  राळेभात, सोले दाजी पाटील, संभाजी मुळे, अर्जुन म्हेत्रे, गणेश आजबे, अनिल सदाफुले, बजरंग डुचे, नितीन ढेरे, मनसेचे प्रदीप टापरे, पवन  राळेभात,राहुल उगले, भरत चव्हाण, सुनील जावळे, वैजीनाथ पोले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पहाटे एकीकडे भक्तिसांगित दुसरीकडे दुधाचा काळा धंदा
शहरविकासाला प्राधान्य ; नियम सर्वांना सारखे : नगराध्यक्ष चिंतामणी
शिक्षक कॉलनीतील धोकादायक विज लाईन थांबवा : नागरिकांचा उपोषणाचा इशारा

गरिबांचे अतिक्रमण काढले; धनदांडग्यासमोर नमले? 

जामखेड : शहरातून जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग ५४८ डी वरील रस्त्याच्या कामाला अडथळा ठरणाऱ्या अतिक्रमण काढण्याच्या मागणीसाठी २६ फेब्रुवारीपासून सर्वपक्षीयांनी बेमुदत बंदची हाक दिली आहे.  अतिक्रमणाबाबत अंतिम कार्यवाही होईपर्यंत जामखेड शहर बंद ठेवण्यात येणार असल्याची घोषणा करण्यात आली आहे.

वेळोवेळी दोन वर्षापासून निवेदन लेखी तोडी सांगून पाठपुरावा केला संबधित प्रशासनाने कसलीही दाखल घेतली नाही म्हणून सामाजिक कार्यकर्ते अवधूत पवार यांनी दि. २४ फेब्रुवारीपासून अतिक्रमण हटविण्याच्या मागणीसाठी उपोषण सुरू केले असून त्यांच्या मागण्या तातडीने मान्य कराव्यात, अशी भूमिका आंदोलनकर्त्यांनी घेतली आहे. शहरातील मुख्य मार्गांवरील अतिक्रमणामुळे वाहतूक कोंडी वाढत असून रस्त्याच्या कामालाही मोठा विलंब होत असल्याने नागरिक, व्यापारी व वाहनचालक त्रस्त झाले आहेत.दरम्यान, मुख्याधिकारी व राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी एकमेकांकडे जबाबदारी ढकलत आहेत.

ठेकेदार बिल नेमके कोणाकडून काढत आहे, असा सवालही नागरिक उपस्थित करत आहेत. आमदार रोहित पवार व सभापती प्रा. राम शिंदे यांनी प्रकरणात लक्ष घालून तातडीने तोडगा काढावा, अशी मागणी करण्यात आली आहे.जोपर्यंत प्रशासनाकडून ठोस कारवाई होत नाही, तोपर्यंत बंद मागे घेतला जाणार नसल्याचा इशारा देत सर्व व्यापारी, नागरिक व ग्रामस्थांनी आंदोलनाला पाठिंबा द्यावा, असे यावेळी अमित चिंतामणी, उपनगराध्यक्ष पोपट राळेभात, नगरसेवक प्रा.विकी घायतडक, ऍड.अरुण जाधव, शहाजी राळेभात, अझहरभाई काझी, संभाजी राळेभात, विकास  राळेभात, सोले दाजी पाटील, संभाजी मुळे, अर्जुन म्हेत्रे, गणेश आजबे, अनिल सदाफुले, बजरंग डुचे, नितीन ढेरे, मनसेचे प्रदीप टापरे, पवन  राळेभात,राहुल उगले, भरत चव्हाण, सुनील जावळे, वैजीनाथ पोले यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी, नगरसेवक व कार्यकर्ते नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

COMMENTS