Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

एकल महिलांनी सक्षमीकरणासाठी पुढे यावे : कुलकर्णी

जामखेड : समाजातील विविध परिस्थितीमुळे विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांना ‘एकल’ म्हणून जीवन जगावे लागते. मात्र ही त्यांची चूक नसून परिस्थितीजन्य अवस्था आहे.अशा महिलांना समाजात सन्मान,सुरक्षितता आणि समान संधी मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.एकल महिलांनी स्वयंरोजगार,सक्षमीकरणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले. आर.सी.एफ,जगदंब फाउंडेशन,साऊ एकल समिती व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला आरोग्य तपासणी व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी हिरा सानप, निवारा बालगृहाचे सर्वेसर्वा अरुण जाधव, कर्जत तालुका समन्वयक उज्वला शेळके, उमेदचे अधिकारी श्यामाप्रसाद सुमंत, रमेश धोत्रे, स्वप्नील नेहरकर, आकाश खरात, पत्रकार यासिन शेख, प्रहार तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार, अनिल आष्टेकर, मीनाक्षी कुलकर्णी आदी विचार मंचावर उपस्थित होते.   यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार देण्यात आले.तसेच सकस संतुलित आहाराचे किट वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, निवारा बालगृहाचे अरुण जाधव, कर्जत तालुका समन्वयक उज्वला शेळके आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत योगेश अब्दुले म्हणाले की  हे फक्त शिबीर नसून समाजातील उपेक्षित एकल महिलांना स्वावलंबी स्वाभिमानी बनविणे हा उद्देश आहे. भविष्यातही जामखेड तालुक्यात मार्गदर्शन कार्यशाळा व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.या मेळाव्यास तब्बल ४५० पेक्षा जास्त एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी केले तर आभार नासिर सय्यद यांनी मानले.

विकासासाठी सदैव नगराध्यक्षांना साथ : टायरवाले 
पोहण्यासाठी गेलेल्या तरुणाचा विहिरीत बुडून मृत्यू
अहिल्यानगरमध्ये थरारक घटना! कुख्यात गुंड सागर मोहोळकरवर दुचाकीस्वारांनी केला गोळीबार

जामखेड : समाजातील विविध परिस्थितीमुळे विधवा, परित्यक्ता, घटस्फोटित महिलांना ‘एकल’ म्हणून जीवन जगावे लागते. मात्र ही त्यांची चूक नसून परिस्थितीजन्य अवस्था आहे.अशा महिलांना समाजात सन्मान,सुरक्षितता आणि समान संधी मिळणे हा त्यांचा घटनात्मक अधिकार आहे.एकल महिलांनी स्वयंरोजगार,सक्षमीकरणासाठी पुढे यावे असे प्रतिपादन साऊ एकल महिला समितीचे राज्य निमंत्रक तथा ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते हेरंब कुलकर्णी यांनी केले.

आर.सी.एफ,जगदंब फाउंडेशन,साऊ एकल समिती व स्नेहालय यांच्या संयुक्त विद्यमाने एकल महिला आरोग्य तपासणी व स्वयंरोजगार मार्गदर्शन मेळाव्या प्रसंगी ते बोलत होते. यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, तालुका आरोग्य अधिकारी डॉ.सुनील बोराडे, बालविकास प्रकल्प अधिकारी हिरा सानप, निवारा बालगृहाचे सर्वेसर्वा अरुण जाधव, कर्जत तालुका समन्वयक उज्वला शेळके, उमेदचे अधिकारी श्यामाप्रसाद सुमंत, रमेश धोत्रे, स्वप्नील नेहरकर, आकाश खरात, पत्रकार यासिन शेख, प्रहार तालुका अध्यक्ष नय्युम सुभेदार, अनिल आष्टेकर, मीनाक्षी कुलकर्णी आदी विचार मंचावर उपस्थित होते. 

 यावेळी तज्ज्ञ डॉक्टरांमार्फत मोफत आरोग्य तपासणी औषधोपचार देण्यात आले.तसेच सकस संतुलित आहाराचे किट वाटप करण्यात आले. यावेळी गटविकास अधिकारी शुभम जाधव, निवारा बालगृहाचे अरुण जाधव, कर्जत तालुका समन्वयक उज्वला शेळके आदींची भाषणे झाली. कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेत योगेश अब्दुले म्हणाले की  हे फक्त शिबीर नसून समाजातील उपेक्षित एकल महिलांना स्वावलंबी स्वाभिमानी बनविणे हा उद्देश आहे.

भविष्यातही जामखेड तालुक्यात मार्गदर्शन कार्यशाळा व रोजगाराभिमुख प्रशिक्षण उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी नमूद केले.या मेळाव्यास तब्बल ४५० पेक्षा जास्त एकल महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा.तुकाराम घोगरदरे यांनी केले तर आभार नासिर सय्यद यांनी मानले.

COMMENTS