Homeताज्या बातम्या

नामदेवराव जाधव यांच्याकडून डॉ. अशोक सोनवणे यांच्या पत्रकारितेचे कौतुक

मुंबई : छत्रपती शासन पक्षाचे सर्वेसर्वा, प्रख्यात वक्ते आणि ऐतिहासिक विषयांचे अभ्यासक नामदेवराव जाधव यांनी दैनिक लोकमंथनचे संस्थापक संपादक डॉ. अशो

बसवेश्वरांच्या विचारांनी समाजात समता रुजवली : आ.मोनिका राजळे
श्रीसंत गोरा कुंभार व वाचन संस्कृती पुरस्कार प्रेरणादायी ठरतीलह.भ.प. डॉ. पुरुषोत्तम महाराज कोळपकर यांचे प्रतिपादन
पुण्याऐवजी हडपसर स्थानकावरच मराठवाड्यातील रेल्वे गाड्या थांबवण्यात येणार

मुंबई : छत्रपती शासन पक्षाचे सर्वेसर्वा, प्रख्यात वक्ते आणि ऐतिहासिक विषयांचे अभ्यासक नामदेवराव जाधव यांनी दैनिक लोकमंथनचे संस्थापक संपादक डॉ. अशोक सोनवणे यांच्या पत्रकारितेचे मनापासून कौतुक केले. बुधवारी मुंबईत झालेल्या भेटीत जाधव यांनी लोकमंथनच्या निर्भीड पत्रकारितेची आज खरी गरज असल्याचे म्हटले आहे.
या वेळी बोलताना जाधव म्हणाले की, दैनिक लोकमंथनच्या माध्यमातून भ्रष्टाचाराविरोधात सातत्याने आणि ठोस भूमिका घेतली जात आहे. सत्ताधार्‍यांवर असो वा प्रशासनावर प्रश्‍न विचारण्याचे धैर्य आणि जनहिताचा आग्रह हीच खरी पत्रकारितेची ओळख आहे. डॉ. अशोक सोनवणे हे जागरूक आणि तत्त्वनिष्ठ पत्रकार असून त्यांनी सुरू ठेवलेली ही सामाजिक लढाई अधिक बळकट व्हावी. राज्यातील विविध प्रश्‍नांवर लोकमंथनने घेतलेली ठाम भूमिका आणि उघडकीस आणलेल्या प्रकरणांचा उल्लेख करत जाधव यांनी सांगितले की, केवळ भ्रष्टाचार उघड करणे इतकेच नव्हे, तर सामाजिक, राजकीय आणि सांस्कृतिक विषयांवरही दिशादर्शक भूमिका मांडण्याचे काम हे माध्यम सातत्याने करत आहे. समाजमनाला विचार करायला लावणारी पत्रकारिता ही लोकशाहीसाठी आवश्यक असल्याचेही त्यांनी नमूद केले. डॉ. अशोक सोनवणे यांनीही या शुभेच्छांबद्दल कृतज्ञता व्यक्त करत, लोकहिताच्या प्रश्‍नांवर भूमिका घेणे आणि सत्तेला जबाबदार धरणे हेच आपल्या कार्याचे ध्येय असल्याचे सांगितले. पत्रकारितेच्या माध्यमातून समाजात सकारात्मक बदल घडवण्याचा प्रयत्न पुढेही सुरू राहील, असा विश्‍वास त्यांनी व्यक्त केला. या भेटीत परस्पर संवादातून वर्तमान राजकीय घडामोडी, सामाजिक प्रश्‍न आणि माध्यमांची जबाबदारी यावरही चर्चा झाल्याची माहिती मिळाली.

COMMENTS