अकोले : सरकारी काम आणी सहा महिने थांब असा अनुभव आला नाही पाहिजे यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे असतात. जिथे लोकांना लाभ देता येतो व कर्तव्यही सांगता येते असा हा महामेळावा आहे. ज्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला त्यांनी स्वतःची आर्थिक, समाजिक प्रगतीकडे एक पाऊल टाकले आहे. अकोलेकरांचा या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकाने उन्नत भारताचे, प्रगतशिल राष्ट्राचे, सुसंपन्न राज्याचे स्वप्न पाहावे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी केले. राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या विशेष निर्देशान्वये अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अकोले तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा व तालुका प्रशासनासह शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आणि अकोले व राजूर तालुका वकील संघाच्या सहकार्याने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा व लाभ वितरण कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती रोहित जोशी, न्या. मेहरोज पठाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती जोशी म्हणाले की न्याय म्हणजे केवळ न्यायालयात दिला जाणारा न्याय नाही. संविधानाच्या उद्दिष्टात म्हटले आहे, जस्टीज फॉर ऑल अर्थात न्याय सर्वासाठी आहे. प्रशासनानेही पुढे असे काम करावे की भविष्यात असे मेळावे घेण्याची गरज पडू नये असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोले तालुका विधी सेवा समितीचे सदस्य मच्छिंद्र मंडलिक, राम रुद्रे, सुमीरन मालुंजकर, दत्ता शेणकर, दत्तात्रय मुठे, रामदास पवार, विजया पाडेकर, सुमन जाधव, मंगल मालुंजकर, मीना म्हसे, अशोक उघडे, श्याम खलाने आदींनी मदत केली.
अकोले : सरकारी काम आणी सहा महिने थांब असा अनुभव आला नाही पाहिजे यासाठी शासनाच्या योजना सर्वसामान्यापर्यंत पोहचवण्यासाठी असे कार्यक्रम महत्वाचे असतात. जिथे लोकांना लाभ देता येतो व कर्तव्यही सांगता येते असा हा महामेळावा आहे. ज्यांनी सरकारी योजनेचा लाभ घेतला त्यांनी स्वतःची आर्थिक, समाजिक प्रगतीकडे एक पाऊल टाकले आहे. अकोलेकरांचा या मेळाव्याला चांगला प्रतिसाद मिळाला असून प्रत्येकाने उन्नत भारताचे, प्रगतशिल राष्ट्राचे, सुसंपन्न राज्याचे स्वप्न पाहावे असे प्रतिपादन अहिल्यानगर जिल्ह्याचे पालक न्यायमूर्ती तथा मुंबई उच्च न्यायालयाचे औरंगाबाद खंडपीठाचे न्यायमूर्ती विभा कंकणवाडी यांनी केले.
राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, सर्वोच्च न्यायालय, नवी दिल्ली, महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या विशेष निर्देशान्वये अहिल्यानगर जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व अकोले तालुका विधी सेवा समिती तसेच जिल्हा व तालुका प्रशासनासह शासकीय विभागांच्या संयुक्त विद्यमाने आणि अकोले व राजूर तालुका वकील संघाच्या सहकार्याने विधी सेवा महाशिबीर व शासकीय योजनांचा महामेळावा व लाभ वितरण कार्यक्रम संपन्न झाला.
यावेळी न्यायमूर्ती विभा कंकणवाडी व न्यायमूर्ती रोहित जोशी, न्या. मेहरोज पठाण, अतिरिक्त जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर, पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे आदी उपस्थित होते. यावेळी न्यायमूर्ती जोशी म्हणाले की न्याय म्हणजे केवळ न्यायालयात दिला जाणारा न्याय नाही. संविधानाच्या उद्दिष्टात म्हटले आहे, जस्टीज फॉर ऑल अर्थात न्याय सर्वासाठी आहे. प्रशासनानेही पुढे असे काम करावे की भविष्यात असे मेळावे घेण्याची गरज पडू नये असे आवाहन केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी अकोले तालुका विधी सेवा समितीचे सदस्य मच्छिंद्र मंडलिक, राम रुद्रे, सुमीरन मालुंजकर, दत्ता शेणकर, दत्तात्रय मुठे, रामदास पवार, विजया पाडेकर, सुमन जाधव, मंगल मालुंजकर, मीना म्हसे, अशोक उघडे, श्याम खलाने आदींनी मदत केली.

COMMENTS