Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

उपअभियंता बापट, पन्हाड आणि पाटील यांचा कोट्यावधींचा अपहार  

कार्यकारी अभियंता स्वाती पाठक यांना बदनाम करण्याचे तिघांचे षडयंत्र तात्काळ हकालपट्टीची मागणी ; तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही मुदतवाढ कशासाठी? मुंब

नांदेडचे शिक्षण क्षेत्र भ्रष्टाचाराच्या दलदलीत !
एसटीतील करोडो-अरबोंचा भ्रष्टाचार थांबवा; महिला व ज्येष्ठांच्या सवलतींना हात लावू नका – नितीन जायभाये यांचा इशारा
सा.बां.तील शाखा अभियंता कमलापुरेचा भ्रष्टाचाराचा उच्छाद  

कार्यकारी अभियंता स्वाती पाठक यांना बदनाम करण्याचे तिघांचे षडयंत्र
तात्काळ हकालपट्टीची मागणी ; तीन वर्षांचा कालावधी पूर्ण होऊनही मुदतवाढ कशासाठी?
मुंबई ः  सार्वजनिक बांधकाम मध्य मुंबई बांधकाम विभागातील उप अभियंता अजय बापट, अनिल पन्हाड आणि नंदकुमार पाटील या त्रिकुटांनी भ्रष्टाचाराचा नवा विक्रम प्रस्थापित करत देखभाल दुरूस्तीच्या नावाखाली कोट्यावधींची बोगस कामे करून बोगस देयके अदा करण्याचा सपाटा लावत शासनाच्या कोट्यावधी रूपयांचा अपहार केला असून या तिन्ही अधिकार्‍यांच्या संपत्तीची आणि त्यांनी केलेल्या अधिकारांचा गैरवापर, तसेच त्यांनी बोंगस देयके अदा करणे, बोगस अंदाजपत्रके तयार करणे, मोजमोप पुस्तिकेत खोट्या नोंदी करणे, व चौकशी होण्याची गरजेची आहे.
याविषयी सविस्तर माहिती अशी की, सार्वजनिक बांधकाम मध्य मुंबई विभागातील कार्यकारी अभियंता श्रीमती स्वाती पाठक यांची बापट, पन्हाड आणि पाटील या अधिकार्‍यांनी यथेच्छ बदनामी करत, त्यांची दिशाभूल करत मोठ्या प्रमाणावर भ्रष्टाचार चालवला आहे. उपअभियंता नंदकुमार पाटील सी-2 मधील भायखळा जेल, ताडदेव पोलिस लाईन, आर्थर रोड, परिसरातील कोट्यावधी रूपयांची देखभाल दुरूस्तींच्या कामांचा निधी पाटील यांनी संगनमताने घशात घातला आहे. यासोबतच उपअभियंता अजय बापट यांच्या अख्तयारीत दादर पोलिस लाईन, माहीम पोलिस लाईन, माहीम पोलिस लाईन, नायगाव पोलिस लाईन, रेल्वे पोलिस लाईनमध्ये देखभाल दुरूस्तीच्या कामाखाली शासकीय निधींची लूट चालवल्याचे दिसून येत आहे. या त्रिकुटांतील तिसरे उपअभियंता अनिल पन्हाड सी-1 मध्ये पोद्दार हॉस्पिटल, वरळी पोलिस कॅम्प, ईएसआय कामगार, धर्मदाय आयुक्त असलेल्या अखत्यारीत केलेल्या देखभाल दुरूस्तीच्या कामाखाली कोट्यावधींची लूट चालवली असून, पन्हाड यांनी ठेकेदारांकडून कामाच्या पोटी 40 टक्के रकमा अ‍ॅडव्हास घेतल्या असल्याचे समोर येत आहे. ठेकेदारांनी त्यासंदर्भात आमच्याकडे तक्रारी केल्या आहेत.
या तिन्ही उप अभियंत्यांनी सन 2021-2022, 2022-2023, 2023-2024, 2024-2025 मार्च 2025 अखेर या वर्षांमध्ये केलेल्या देखभाल दुरूस्तीच्या कामांमध्ये अनियमितता करत नियमबाह्य कामे पूर्णत्वास नेली आहे. त्यासंदर्भात बोगस बिले काढून, हा निधी हडप केला आहे. या तिन्ही अधिकार्‍यांची कारकीर्द भ्रष्टाचाराने बरबटलेली असून, या तिघांचाही मुंबईतील तीन वर्षांचा कार्यकाळ पूर्ण झालेला असतांना तिघेही मुदतवाढीसाठी प्रयत्न करतांना दिसून येत आहे. या तिघांचीही मुंबईतून उचलबांगडी करून त्यांची मुंबईच्या बाहेर बदली करण्याची गरज आहे. या त्रिकुटांने कार्यकारी अभियंता स्वाती पाठक यांना न जुमानता, संगनमताने शाासकीय तिजोरीची लयलूट चालवली आहे. सर्वसामान्यांच्या देखभाल दुरूस्तीच्या निधींवर डल्ला मारला आहे. याप्रकरणी या तिन्ही अधिकार्‍यांची सार्वजनिक बांधकाम विभागाकडून खातेनिहाय आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून त्यांच्या संपत्तीची चौकशी होण्याची मागणी आम्ही करत आहोत.

उपअभियंता अजय बापट हा दीपक टनके कोण ?
उपअभियंता अजय बापट यांनी उप विभागात नियमबाह्य कामांचा धडाका लावला असून, त्यांनी देखभाल दुरूस्तीच्या कामांमध्ये मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार करत कोट्यावधी रूपयांचा निधी हडप केला आहे. बापट यांना आमचा सवाल आहे की, त्यांनी दीपक टनके कोण ? बंटी आणि बबली कोण ? या प्रश्‍नांचे उत्तर द्यावे.

COMMENTS