Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

दादा पाटील’च्या शाहिदची अधिकारी पदाला गवसणी 

किराणा व्यावसायिकाचा मुलगा झाला सहाय्यक कृषी संचालक कर्जत : तालुक्यातील कुंभेफळसारख्या छोट्या गावातून आलेल्या, किराणा व्यावसायिकाचा मुलगा शाहिद अफसर शेख याने राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. दादा पाटील महाविद्यालयचा विद्यार्थी असलेल्या शाहिदची ‘सहाय्यक कृषी संचालक (क्लास वन)’ पदी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली. कुंभेफळ येथील किराणा व्यावसायिक अफसर शेख यांचा शाहिद हा मुलगा असून, ग्रामीण भागातून येऊनही त्याने जिद्द, सातत्य व अभ्यासाच्या जोरावर राज्यात अव्वल यश मिळवले आहे. प्राचार्य कक्षात झालेल्या सत्काराला उत्तर देताना शाहिद म्हणाला, “ग्रामीण भागातही उच्च दर्जाचे टॅलेंट असते. दादा पाटील महाविद्यालयात माझी शैक्षणिक जडणघडण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करत असतानाच मला राज्यसेवेत क्लास वन पद मिळाले. पुढेही मी यूपीएससीची तयारी सुरू ठेवून जिल्हाधिकारी पद मिळवण्याचे ध्येय गाठणार आहे.” या सत्कारप्रसंगी त्याला मार्गदर्शन करणारे प्रा. प्रवीण घालमे, विभागप्रमुख प्रा. जयदीप खेरमाळीस, प्रा. विकास भोसले, प्रा. दिलीप मगर, प्रा. सर्जेराव हाळणवर, ग्रंथपाल नारायण मेंगाळ, प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. संदीप इथापे, प्रा. विशाल शेळके, प्रा. संगीता भोसले, प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा. अजितकुमार गुळवे तसेच विद्यार्थी उपस्थित होते. शाहिदच्या या  यशाबद्दल महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी सदस्य आ. रोहित पवार, अध्यक्ष व जनरल बॉडी सदस्य राजेंद्र  फाळके, अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

टेलर दुकानाला भीषण आग ; साडेचार लाखांचे नुकसान
कर्जतमधील पर्यावरण संवर्धनाची वनरक्षक प्रशिक्षणार्थींकडून पाहणी
ऍड. गवारे ‘एनआयए’च्या ‘स्पेशल पब्लिक प्रॉसिक्यूटर’पदी 

किराणा व्यावसायिकाचा मुलगा झाला सहाय्यक कृषी संचालक

कर्जत : तालुक्यातील कुंभेफळसारख्या छोट्या गावातून आलेल्या, किराणा व्यावसायिकाचा मुलगा शाहिद अफसर शेख याने राज्यसेवा स्पर्धा परीक्षेत राज्यात प्रथम क्रमांक पटकावत उल्लेखनीय यश मिळवले आहे. दादा पाटील महाविद्यालयचा विद्यार्थी असलेल्या शाहिदची ‘सहाय्यक कृषी संचालक (क्लास वन)’ पदी निवड झाली असल्याची माहिती प्राचार्य डॉ. संजय नगरकर यांनी दिली.

कुंभेफळ येथील किराणा व्यावसायिक अफसर शेख यांचा शाहिद हा मुलगा असून, ग्रामीण भागातून येऊनही त्याने जिद्द, सातत्य व अभ्यासाच्या जोरावर राज्यात अव्वल यश मिळवले आहे. प्राचार्य कक्षात झालेल्या सत्काराला उत्तर देताना शाहिद म्हणाला, “ग्रामीण भागातही उच्च दर्जाचे टॅलेंट असते. दादा पाटील महाविद्यालयात माझी शैक्षणिक जडणघडण झाली. केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेची तयारी करत असतानाच मला राज्यसेवेत क्लास वन पद मिळाले. पुढेही मी यूपीएससीची तयारी सुरू ठेवून जिल्हाधिकारी पद मिळवण्याचे ध्येय गाठणार आहे.”

या सत्कारप्रसंगी त्याला मार्गदर्शन करणारे प्रा. प्रवीण घालमे, विभागप्रमुख प्रा. जयदीप खेरमाळीस, प्रा. विकास भोसले, प्रा. दिलीप मगर, प्रा. सर्जेराव हाळणवर, ग्रंथपाल नारायण मेंगाळ, प्रा. मीना खेतमाळीस, प्रा. संदीप इथापे, प्रा. विशाल शेळके, प्रा. संगीता भोसले, प्रा. सुखदेव कोल्हे, प्रा. अजितकुमार गुळवे तसेच विद्यार्थी उपस्थित होते.

शाहिदच्या या  यशाबद्दल महाविद्यालय विकास समिती व जनरल बॉडी सदस्य आ. रोहित पवार, अध्यक्ष व जनरल बॉडी सदस्य राजेंद्र  फाळके, अंबादास पिसाळ, राजेंद्र निंबाळकर, बप्पाजी धांडे, माजी विद्यार्थी संघाचे पदाधिकारी, पालक, शिक्षक, शिक्षकेतर सेवक आणि विद्यार्थ्यांनी विशेष अभिनंदन केले आहे.

COMMENTS