Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिगवण प्रकरणाला कलाटणी ; अपहरण नसल्याचा तरूणीचा जबाब

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे काही दिवसांपूर्वी गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे. अपहृत म्हणून शोध घेतली जात असलेली तरु

Indapur : बावडा शहाजीबाग येथे भीषण अपघात (Video)
Indapur : इंदापूरात चपली चोरणाऱ्या महिलांची टोळी सक्रिय (Video)
Indapur : राज्य सरकारने घेतलेल्या मंदिरे खुली करण्याच्या निर्णयाचे स्वागत (Video)

पुणे : इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे काही दिवसांपूर्वी गाजलेल्या कथित अपहरण प्रकरणाला अनपेक्षित वळण मिळाले आहे. अपहृत म्हणून शोध घेतली जात असलेली तरुणी गुरुवारी मध्यरात्री सुमारे दीडच्या सुमारास बारामती शहर पोलिस ठाण्यात स्वतःहून हजर झाली. तिने दिलेल्या लेखी प्रतिज्ञापत्रात आपण कोणाच्याही दबावाखाली नसून स्वतःच्या इच्छेने मित्रासोबत घर सोडल्याचे स्पष्ट नमूद केले आहे. त्यामुळे संपूर्ण प्रकरणाचा स्वरूपच बदलण्याची चिन्हे निर्माण झाली आहेत.
या घटनेमुळे सुरुवातीला नोंदविण्यात आलेल्या अपहरणाच्या गुन्ह्याबाबत प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले असले, तरी पोलिसांनी तपास सुरूच ठेवला आहे. कोणत्याही प्रकारचा दबाव, फसवणूक किंवा इतर गुन्हेगारी बाबी दडलेल्या नाहीत ना, याची सर्वांगीण पडताळणी केली जात असल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले. गत 17 तारखेला संबंधित तरुणी आई व भावासोबत लग्नासाठी खरेदी करून घरी परतत असताना भरदिवसा काही व्यक्तींनी त्यांच्यावर हल्ला केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला होता. आई व भावाच्या डोळ्यांत मिरचीपूड टाकून त्यांना मारहाण करण्यात आली आणि तरुणीला जबरदस्तीने वाहनात बसवून नेण्यात आल्याची तक्रार पोलिसांत नोंदविण्यात आली होती. या तक्रारीनुसार दोन सख्ख्या भावांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली होती. भरदिवसा घडलेल्या या प्रकारामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. पोलिसांनी तातडीने तपासाची सूत्रे हाती घेत विविध पथके तयार करून शोधमोहीम सुरू केली होती. दरम्यान, तरुणीचा एक व्हिडिओ समोर आला होता. त्यात तिने आपले अपहरण झाले नसून आपण स्वतःच्या इच्छेने घर सोडल्याचे सांगितले होते. मात्र, हा व्हिडिओ दबावाखाली तयार करून घेतला गेला असण्याची शक्यता नाकारता येत नसल्याने पोलिसांनी त्याची सत्यता पडताळण्यावर भर दिला होता. तिचा प्रत्यक्ष जबाब नोंदविल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढणे घाईचे ठरेल, असेही पोलिसांनी स्पष्ट केले होते.

COMMENTS