Homeताज्या बातम्याक्रीडा

भारतीय संघाला हरवणे कठीण : रविचंद्रन अश्‍विन

मुंबई : टी-20 विश्‍वचषकाच्या गट टप्प्यात अपराजित राहून भारतीय संघाने सुपर-8 फेरीत दमदार पाऊल टाकले आहे. सलग विजयांमुळे संघाचा आत्मविश्‍वास उंचावला

न्यूझीलंडविरुद्धच्या पराभावाला फलंदाज जबाबदार ः गिल
एमसीए निवडणूक वादाला न्यायालयीन ब्रेक
बांगलादेश टी-20 विश्‍वचषकाबाहेर

मुंबई : टी-20 विश्‍वचषकाच्या गट टप्प्यात अपराजित राहून भारतीय संघाने सुपर-8 फेरीत दमदार पाऊल टाकले आहे. सलग विजयांमुळे संघाचा आत्मविश्‍वास उंचावला असून क्रिकेटविश्‍वात त्याला विजेतेपदाचा प्रबळ दावेदार मानले जात आहे. मात्र, भारतीय संघाचा माजी फिरकीपटू रविचंद्रन अश्‍विन यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, संघ नेहमीच सर्वोत्तम फॉर्ममध्ये नसला तरी त्याची एकत्रित ताकद इतकी प्रभावी आहे की साधारण कामगिरीतही त्याला पराभूत करणे सोपे नाही.
भारतीय संघासमोर सुपर-8 फेरीत गतविजेते दक्षिण आफ्रिका, झिम्बाब्वे आणि वेस्ट इंडिज यांचे आव्हान उभे आहे. प्रत्येक संघाकडे दर्जेदार खेळाडू असले तरी भारतीय संघाची संतुलित रचना आणि अनुभव या दोन्ही बाबी त्याला वेगळे बळ देतात. अश्‍विन यांनी एका चर्चासत्रात संघाच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे कौतुक करताना फलंदाज आणि गोलंदाज दोघांच्याही योगदानाचा विशेष उल्लेख केला. नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यातील फलंदाजी अपेक्षेइतकी भेदक नसल्याची कबुली देत त्यांनी म्हटले की, डावाची सुरुवात संयमाने झाली. सूर्यकुमार यादव यांनी परिस्थिती ओळखून खेळ रचला, तर पुढील फळीतील शिवम दुबे, हार्दिक पांड्या आणि रिंकू सिंग यांनी योग्य वेळी धावगती वाढवण्याची क्षमता दाखवली. धावगती वाढवायची वेळ आली की हे खेळाडू सज्ज असतात. त्यांना सामना कसा वळवायचा हे ठाऊक आहे, असे अश्‍विन यांनी नमूद केले. गोलंदाजांच्या कामगिरीविषयी बोलताना त्यांनी वरुण चक्रवर्ती यांच्या फिरकीची प्रशंसा केली. त्यांच्या चेंडूंचा अंदाज डच फलंदाजांना बांधता आला नाही, असे त्यांनी सांगितले. तसेच जसप्रीत बुमराह यांनी पॉवरप्लेमध्ये मिळालेल्या स्विंगचा प्रभावी उपयोग करत अचूक यॉर्कर टाकल्या, याकडेही त्यांनी लक्ष वेधले. गोलंदाजीतील ही धारच भारतीय संघाची खरी ताकद ठरत असल्याचे त्यांनी अधोरेखित केले. फलंदाजीच्या तंत्राविषयी मत व्यक्त करताना अश्‍विन यांनी तिलक वर्मा यांचा विशेष उल्लेख केला. टी-20 क्रिकेटमध्ये केवळ जोरदार फटकेबाजी पुरेशी नसते; योग्य वेळ साधून, बॅटच्या मध्यभागी चेंडू लागत गॅप शोधणे अधिक परिणामकारक ठरते, असे त्यांनी सांगितले. काही खेळाडू आक्रमक शैलीत धावा काढतात, तर काही जण संयम आणि अचूक टाइमिंगवर भर देतात. दोन्ही पद्धती संघासाठी उपयुक्त ठरू शकतात, असे ते म्हणाले.

उद्या भारताचा सामना दक्षिण अफ्रिकेशी
सुपर-8 फेरीतील पहिला महत्त्वाचा सामना उद्या रविवारी अहमदाबाद येथील नरेंद्र मोदी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिकेविरुद्ध रंगणार आहे. त्यानंतर 26 फेब्रुवारीला झिम्बाब्वेविरुद्ध आणि 1 मार्चला वेस्ट इंडिजविरुद्ध भारतीय संघ अंतिम लढतीसाठी उतरणार आहे. या तिन्ही सामन्यांमधील कामगिरीवर पुढील प्रवासाची दिशा ठरणार आहे.

COMMENTS