Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

नांदेडमध्ये बनावट जन्म प्रमाणपत्र रॅकेटचा भंडाफोड; मास्टरमाइंड बिहारचा

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून या रॅकेटचा मास्टरमाइंड बिहार राज्यातील असल्याचे तपासात उघड झ

प्रभाग क्रमांक दोनमध्ये जुन्या नगरसेवकांविरोधात संतापाची लाट; पाणी, कर आणि कचर्‍याने नागरिक त्रस्त
नांदेड-वाघाळा महानगरपालिका क्षेत्रातील सर्व मतदान केंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश
नांदेडमध्ये नवजात अर्भकांचे टाकाऊ आयुष्य?

नांदेड ः नांदेड जिल्ह्यातील बनावट जन्म प्रमाणपत्र प्रकरणात धक्कादायक माहिती समोर आली असून या रॅकेटचा मास्टरमाइंड बिहार राज्यातील असल्याचे तपासात उघड झाले आहे. झारखंडसह विविध राज्यांतील नागरिकांना नांदेड जिल्ह्यातील ग्रामपंचायतींच्या नोंदीतून बेकायदेशीरपणे जन्म प्रमाणपत्रे मिळवून देण्यात आल्याचे निष्पन्न झाले आहे.
तपासादरम्यान एका गावातून तब्बल 15 हजार 469 बनावट जन्म प्रमाणपत्रे जारी झाल्याची बाब समोर आली आहे. या प्रकरणी आतापर्यंत 12 जणांना अटक करण्यात आली असून, संबंधित संगणक ऑपरेटर, दलाल आणि काही स्थानिक सहकार्‍यांचा समावेश आहे. पोलिसांनी डिजिटल पुरावे, संगणक हार्डडिस्क, नोंदवही व ऑनलाइन नोंदणी प्रणालीतील माहिती जप्त केली आहे. प्राथमिक तपासानुसार, बाहेरील राज्यांतील व्यक्तींना भारतीय नागरिकत्वाशी संबंधित कागदपत्रे मिळवून देण्यासाठी या जन्म प्रमाणपत्रांचा वापर केला जात होता. यासाठी स्थानिक पातळीवरील अधिकृत यंत्रणेतील काही त्रुटींचा गैरफायदा घेत ऑनलाइन प्रणालीत खोटी माहिती भरून प्रमाणपत्रे तयार करण्यात येत होती. या प्रक्रियेत बनावट कागदपत्रे व खोटी ओळखपत्रे सादर करून जन्मनोंदणी दाखल केली जात असल्याचे स्पष्ट झाले आहे. पोलिसांनी या प्रकरणात बिहार राज्यातील एका मुख्य सूत्रधाराचा शोध घेतला असून त्याच्याकडून संपूर्ण जाळ्याचे धागेदोरे मिळण्याची शक्यता आहे.
याबाबत सविस्तर माहिती अशी की पंधरा दिवसांपूर्वी भाजपचे नेते किरीट सोमय्या हे नांदेडला आले होते नांदेड जिल्ह्यातील लोहा तालुक्यातील सावळेश्‍वर गावातील लोकसंख्या 1 हजार 500 आहे आणि या गावातून तब्बल  15 हजार 569जन्म नोंदणी प्रमाणपत्र काढण्यात आले असल्याची माहिती उजेडात आली. झारखंड राज्यातील एका व्यक्तीने जमीनवादाच्या प्रकरणातून सावळेश्‍वर येथे येऊन काढलेले जन्म नोंदणी प्रमाणपत्र बनावट असल्याचे प्रकरण समोर आले त्यानंतर यातील धागेद्वारे सापडण्यास सुरुवात झाली त्यामुळे 15 हजार 569 बनावट जन्म प्रमाणपत्र बनावट असल्याची बाब पुढे आली आहे आणि कंधार तालुक्यातील उस्मान नगर पोलीस ठाण्यात सुरुवातीला या प्रकरणात अज्ञात व्यक्तींनी विरोधात गुन्हा दाखल झाला होता. यातील धागेदोरे हे झारखंड पर्यंत पोहोचल्याने पोलीस निरीक्षक आयलाने यांनी पथकाला झारखंड राज्यातील गढवा येथील जितेंद्रकुमार सिंह, महेंद्र प्रतापसिंह, ओमप्रकाश उमेश मिश्रा, लक्ष्मी अमितकुमार पंडित, सुमितकुमार निर्मलसिंह, आणि सतीश कुमार साहू या पाच जणांना अटक केली हे पाचही जण सध्या पोलीस कोठडीत आहेत झारखंड मधून अटक करण्यात आलेल्या आरोपींकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे यातील मास्टरमाइंड हा बिहारमधील असल्याची बाब पुढे आली आहे. सिव्हिल रजिस्ट्रेशन सिस्टीम या पोर्टलवर झारखंड येथील आयपी ऍड्रेस वरून सावळेश्‍वर ग्रामपंचायतचा युजर आयडी आणि पासवर्ड हॅक करण्यात आला व मे  2025 ते नोव्हेंबर 2025 या सहा महिन्यात 15 हजार बनावट जन्म नोंदणी प्रमाणपत्र काढण्यात आले. यातून पकडलेल्या आरोपीचे व्हाट्सअप ग्रुप तयार करण्यात आले आहेत. त्याचबरोबर दलाल व सायबर कॅफे चालकांना सोबत घेऊन हे रॅकेट सुरू आहेत. सध्या देशातील महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, झारखंड, तेलंगणा, बिहार, पश्‍चिम बंगाल या सहा राज्यात या रॅकेटची व्याप्ती असल्याचे समजते.

COMMENTS