Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

भिंगार अर्बन बँकेत छत्रपती शिवरायांना अभिवादन

भिंगार : भिंगार परिसरातील भिंगार अर्बन बँक येथे  १८ फेब्रुवारीरोजी सायंकाळी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता

जामखेड बस स्थानकावरून विवाहिता बेपत्ता
कोरोना संसर्ग साखळी तोडण्यास सर्वोच्च प्राधान्य: जिल्हाधिकारी डॉ. भोसले
गडाख कुटुंबीयांची दुर्गाताई तांबे यांनी घेतली भेट

भिंगार : भिंगार परिसरातील भिंगार अर्बन बँक येथे  १८ फेब्रुवारीरोजी सायंकाळी शिवजयंती उत्सवाच्या निमित्ताने विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाची सुरुवात महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. अखंड मराठा समाज तसेच भिंगार अर्बन बँकेचे चेअरमन, व्हाईस चेअरमन आणि सर्व संचालक मंडळ यांच्या हस्ते अभिवादन करण्यात आले. त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस वंदन करून शिवजयंती उत्सवाची औपचारिक सुरुवात करण्यात आली.

यावेळी संभाजी ब्रिगेडचे कार्याध्यक्ष आच्युत गाडे व अध्यक्ष कैलास वाघस्कर यांच्या नेतृत्वाखाली कार्यक्रम पार पडला. यावेळी अर्बन बँकेचे चेअरमन अनिलराव झोडगे, व्हाइस चेअरमन किसनराव चौधरी, महेश झोडगे, संजय सपकाळ, शामराव वाघस्कर, राजेश काळे, एकनाथ जाधव, मच्छिंद्र बेरड, मतीन सय्यद, मळुराज गाडेकर, विविध सामाजिक संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. 

यावेळी उद्योजक महेश झोडगे म्हणाले की “समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन अशा ऐतिहासिक दिवसांचे स्मरण करणे ही अभिमानाची बाब आहे. शिवरायांचा आदर्श आणि महात्मा फुले यांचे सत्यशोधक विचार समाजाला दिशा देणारे आहेत. राजेश काळे म्हणाले की, “शिवराय आणि महात्मा फुले यांचे कार्य हे समाजजागृतीचे दीपस्तंभ आहेत. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन त्यांच्या विचारांचा वारसा जपला पाहिजे. 

शामराव वाघस्कर यांनी सांगितले की, “शिवरायांचा इतिहास हा केवळ भूतकाळ नाही, तर तो वर्तमान आणि भविष्य घडविण्याची शक्ती आहे. महात्मा फुले यांनी शिवजयंती सुरू करून समाजाला स्वाभिमानाची जाणीव करून दिली. संजय सपकाळ यांनी सांगितले की, “छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशासाठी आणि स्वराज्यासाठी आयुष्य अर्पण केले. अन्यायाविरुद्ध लढा देत त्यांनी सामान्य जनतेला सुरक्षित आणि सन्मानाने जगण्याचा अधिकार दिला. मतीन सय्यद म्हणाले की, “छत्रपती शिवाजी महाराज हे सर्व धर्मांचा आदर करणारे आणि न्याय देणारे राजे होते. त्यांनी मुस्लिम बांधवांच्या मशिदी, दरगाह आणि धार्मिक स्थळांचे संरक्षण केले.

COMMENTS