अकोले : तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठोकळवाडी येथे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून कुसुमाग्रज वाचन अभियान, ग्रंथदिंडी तसेच तेग बहादुर जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला. विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात ग्रंथ घेऊन प्रभातफेरी काढली. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग, गवळणी सादर करत परिसरात जनजागृती केली. “चला शाळेमध्ये जाऊ, वाचनाने समृद्ध होऊ” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब दातीर यांनी केले. यावेळी शिक्षक घनश्याम नवले, जि. प. प्राथमिक शाळेचे सुधाकर भांगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लालू कृष्णा धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमास राजा हरिश्चंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब दातीर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम गभाले, महादर्पणचे प्रतिनिधी संतु जाधव, तसेच तुकाराम बेनके, विजय बढे, नारायण धोंगडे, पोपट भांगरे, विठ्ठल धोंडे, नगालो तुकाराम रेड्डी, मार्टीकल मिंथालू, संस्थेचे खजिनदार मुरलीधर तळपे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन घनश्याम नवले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

अकोले : तालुक्यातील राजा हरिश्चंद्र माध्यमिक विद्यालय व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, ठोकळवाडी येथे जिल्हा परिषद अहिल्यानगरचे मुख्य कार्यकारी अधिकारी आनंद भंडारी यांच्या संकल्पनेतून कुसुमाग्रज वाचन अभियान, ग्रंथदिंडी तसेच तेग बहादुर जयंती कार्यक्रम उत्साहात संपन्न झाला.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनसंस्कृती रुजावी या उद्देशाने आयोजित करण्यात आलेल्या ग्रंथदिंडीत शाळेतील विद्यार्थ्यांनी हातात ग्रंथ घेऊन प्रभातफेरी काढली. टाळ-मृदंगाच्या गजरात विद्यार्थ्यांनी संतांचे अभंग, गवळणी सादर करत परिसरात जनजागृती केली. “चला शाळेमध्ये जाऊ, वाचनाने समृद्ध होऊ” असा संदेश देत विद्यार्थ्यांनी वाचनाचे महत्त्व पटवून दिले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक शाळेचे मुख्याध्यापक बाळासाहेब दातीर यांनी केले. यावेळी शिक्षक घनश्याम नवले, जि. प. प्राथमिक शाळेचे सुधाकर भांगरे यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे अध्यक्ष लालू कृष्णा धोंगडे यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व सांगत प्रेरणादायी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमास राजा हरिश्चंद्र विद्यालयाचे मुख्याध्यापक बाळासाहेब दातीर, जि. प. शाळेचे मुख्याध्यापक तुळशीराम गभाले, महादर्पणचे प्रतिनिधी संतु जाधव, तसेच तुकाराम बेनके, विजय बढे, नारायण धोंगडे, पोपट भांगरे, विठ्ठल धोंडे, नगालो तुकाराम रेड्डी, मार्टीकल मिंथालू, संस्थेचे खजिनदार मुरलीधर तळपे यांच्यासह पालक व ग्रामस्थ उपस्थित होते. सूत्रसंचालन घनश्याम नवले यांनी केले. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांचे आभार मानण्यात आले.

COMMENTS