जामखेड : नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे अमली पदार्थ विक्री करणारे रँकेट जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातही सक्रिय असून जामखेड शहर व तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहिल्यानगर व जामखेड पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जामखेडला विक्रीसाठी आणलेला २ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत माहिती संकलन सुरू केले होते. गुप्त माहितीच्या आधारे मंगेश हिरामन पवार (वय ३०, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) हा एम.डी. विक्रीसाठी जामखेड-कर्जत रोडवरील वैशाली वुड फर्निचर दुकानासमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार जामखेड पोलीसांकडून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत ६.१७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) किंमत १,२३,४०० रुपये व १ लाख रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण २,२३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीने हा अंमली पदार्थ मकसूद बागवान (रा. करमाळा, जि. सोलापूर – फरार) याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. हृदय गौतम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, राहुल द्वारके, गणेश लबडे, संतोष खैरे, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, पोकाँ भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालकर, चालक अरूण मोरे, महादेव मिसाळ यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत.

जामखेड : नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे अमली पदार्थ विक्री करणारे रँकेट जामखेड तालुक्यातील ग्रामीण भागातही सक्रिय असून जामखेड शहर व तालुक्यात स्थानिक गुन्हे अन्वेषण विभाग अहिल्यानगर व जामखेड पोलीसांनी संयुक्त कारवाई करत जामखेडला विक्रीसाठी आणलेला २ लाख २३ हजार ४०० रुपयांचा मॅफेड्रॉन अंमली पदार्थसह मुद्देमाल ताब्यात घेतला आहे. पोलीस अधीक्षक सोमनाथ घार्गे यांनी अंमली पदार्थ विक्री करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते.त्यानुसार अंमली पदार्थ विरोधी टास्क फोर्सचे नोडल अधिकारी पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने जामखेड पोलीस स्टेशन हद्दीत माहिती संकलन सुरू केले होते.
गुप्त माहितीच्या आधारे मंगेश हिरामन पवार (वय ३०, रा. कान्होपात्रानगर, जामखेड) हा एम.डी. विक्रीसाठी जामखेड-कर्जत रोडवरील वैशाली वुड फर्निचर दुकानासमोर येणार असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यानुसार जामखेड पोलीसांकडून सापळा रचून आरोपीला ताब्यात घेण्यात आले. त्याच्या झडतीत ६.१७ ग्रॅम मॅफेड्रॉन (एम.डी.) किंमत १,२३,४०० रुपये व १ लाख रुपये किंमतीची मोटारसायकल असा एकूण २,२३,४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.आरोपीने हा अंमली पदार्थ मकसूद बागवान (रा. करमाळा, जि. सोलापूर – फरार) याच्याकडून आणल्याची कबुली दिली आहे.
या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोहेकॉ. हृदय गौतम घोडके यांनी दिलेल्या फिर्यादी वरून वरील दोन जणांविरोधात जामखेड पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक सोमनाथ घार्गे व उपविभागीय पोलीस अधिकारी प्रविणचंद लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किरणकुमार कबाडी व जामखेड पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी यांच्यासह पोलीस उपनिरीक्षक समीर अभंग, राहुल द्वारके, गणेश लबडे, संतोष खैरे, पोलीस नाईक शामसुंदर जाधव, भीमराज खडसे, पोकाँ भाऊसाहेब काळे, अमोल कोतकर, सुनील मालकर, चालक अरूण मोरे, महादेव मिसाळ यांच्या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी हे करत आहेत.


COMMENTS