Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

ठाकरे बंधूंचे संजय राऊतांनी ठोचले कान

आक्रमक प्रचार, आणि महाराष्ट्र दौरा ठरला असता निर्णायकमुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर राजकीय वर्तुळात आत्मपरीक्षणाची च

तीन महिने मंत्रिमंडळ निवडणूक रणांगणात; नांदेडकरांच्या प्रश्नांना कोण देणार उत्तर?
जाहीरनाम्यांची फॉरेन्सिक तपासणी; भाजपचा आरोप काँग्रेस ‘कॉपी-पेस्ट’, राष्ट्रवादी ‘फोटो-पेस्ट’!
नागरिकांच्या मूलभूत प्रश्नांकडे नगरसेवकांची बेफिकिरी; सर्वच पक्षांना मतदार धडा शिकवण्याच्या तयारीत

आक्रमक प्रचार, आणि महाराष्ट्र दौरा ठरला असता निर्णायक
मुंबई ः स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांतील पराभवानंतर राजकीय वर्तुळात आत्मपरीक्षणाची चर्चा सुरू झाली असताना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी आपल्या पक्षातील नेतृत्वावरच सूचक भाष्य केले आहे. त्यांनी थेट ठाकरे बंधूंना उद्देशून, आक्रमक प्रचार आणि महाराष्ट्र दौरा केला असता तर, निकाल वेगळे दिसले असते, असे सांगत ठाकरे बंधूंचे कान टोचले आहे.
राऊत यांनी स्पष्ट शब्दांत मांडले की, महाराष्ट्र पालथा घालून प्रचार मोहीम राबवली असती, तर मतदारांपर्यंत वेगळा संदेश पोहोचला असता आणि निकालाचे आकडे बदलले असते. आत्मविश्‍वासाचे अनेक प्रकार असतात-सत्तेचा, पैशाचा, ताकदीचा आणि ज्ञानाचा. मात्र आंधळा आत्मविश्‍वास धोकादायक ठरतो, असा टोला त्यांनी विरोधकांनाही लगावला. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांत भारतीय जनता पक्ष आणि त्यांच्या सहयोगी पक्षांनी सलग यश मिळवले. अनेक जिल्हा परिषदांमध्ये विरोधकांना अपेक्षित कामगिरी करता आली नाही. या पार्श्‍वभूमीवर राऊत यांनी लढण्याची आणि जिंकण्याची भूक टिकून आहे का? असा प्रश्‍न उपस्थित केला. त्यांच्या मते, केवळ आर्थिक बळावर निवडणुका जिंकता येतात, हा समज चुकीचा आहे. सामान्य कार्यकर्त्यांच्या कष्टातून आणि स्थानिक पातळीवरील संघटनशक्तीतूनही विजय मिळवता येतो. पराभवाचा दोष फक्त बाह्य कारणांवर टाकण्याऐवजी अंतर्मुख होण्याची गरज असल्याचे त्यांनी सूचित केले. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांमध्ये लढण्याची इच्छाशक्ती नसल्याची टीका केली होती. त्या विधानाचा उल्लेख करताना राऊत म्हणाले की, पराभवामागील कारणे बहुआयामी आहेत. काही ठिकाणी संघटनात्मक कमतरता जाणवली, तर काही ठिकाणी राजकीय डावपेच प्रभावी ठरले. निवडणुकीच्या राजकारणात उमेदवारांची फोडाफोड, निवडून आलेल्यांना आपल्या गोटात ओढणे किंवा आर्थिक प्रभावाचा वापर अशा बाबींचा प्रभाव नाकारता येत नाही, असेही त्यांनी नमूद केले. त्यामुळे विरोधकांची पिछेहाट ही केवळ इच्छाशक्तीअभावी नाही, तर बदलत्या राजकीय समीकरणांचा परिणाम आहे, असा त्यांचा सूर होता. मुंबईसारख्या महानगरात झालेल्या निवडणुकांत पक्षांतर केलेल्या काही माजी नगरसेवकांना पराभवाचा सामना करावा लागला. मोठ्या प्रमाणावर खर्च करूनही अपेक्षित यश न मिळाल्याची उदाहरणे समोर आली. यावरून मतदार केवळ पैशांच्या बळावर प्रभावित होत नाहीत, हा संदेश स्पष्ट झाल्याचे निरीक्षण राऊत यांनी नोंदवले.

COMMENTS