Homeताज्या बातम्यादेश

वंदे मातरम देशनिष्ठेची कसोटी ठरू नये : ओवेसी

नवी दिल्ली : सार्वजनिक जीवनात राष्ट्रभक्तीची अभिव्यक्ती कोणत्या मर्यादेत असावी आणि तिचे मोजमाप कशाने करावे, या प्रश्‍नावर पुन्हा एकदा राजकीय वाद र

पुण्यातून लोकसभा लढवणार नाही : उपमुख्यमंत्री फडणवीस
तोतया पोलिसाकडून लाखोंची फसवणूक
बस झाडाला अडकली अन् प्रवासी बचावले

नवी दिल्ली : सार्वजनिक जीवनात राष्ट्रभक्तीची अभिव्यक्ती कोणत्या मर्यादेत असावी आणि तिचे मोजमाप कशाने करावे, या प्रश्‍नावर पुन्हा एकदा राजकीय वाद रंगला आहे. एमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवैसी यांनी ‘वंदे मातरम’चा सन्मान करणे ही देशनिष्ठेची कसोटी ठरू नये, असे स्पष्ट मत व्यक्त केले. त्यांच्या या भूमिकेमुळे राजकीय वातावरणात नव्याने चर्चा सुरू झाली आहे. एका मुलाखतीत बोलतांना ओवेसी यांनी हे विधान केले आहे.
पुढे बोलतांना ओवैसी म्हणाले की, भारताचे संविधान ‘आम्ही भारताचे लोक’ या शब्दांनी सुरू होते; ते कोणत्याही घोषणाबाजीने सुरू होत नाही. देशाशी निष्ठा दाखवण्यासाठी विशिष्ट घोषणाच करावी, अशी सक्ती लोकशाही तत्त्वांना धरून नाही, असे ते म्हणाले. त्यांनी संविधानातील कलम 25 चा उल्लेख करत धर्मस्वातंत्र्य हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत अधिकार असल्याची आठवण करून दिली. केंद्र सरकारने 12 फेब्रुवारी रोजी काढलेल्या आदेशानुसार ‘वंदे मातरम’ला राष्ट्रगीताइतका सन्मान देणे अनिवार्य करण्यात आले आहे. आदेशानुसार, गीताची सर्व सहा कडवी सादर करण्याची तरतूद करण्यात आली असून त्यासाठी निश्‍चित कालावधीही नमूद केला आहे. यापूर्वी प्रामुख्याने पहिली दोन कडवीच गायली जात होती. या निर्णयावरून सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात मतभेद दिसून येत आहेत. ओवैसी यांनी या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि भारतीय जनता पक्षावर टीका करत, भारताला धार्मिक राष्ट्राच्या दिशेने नेण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप केला. त्यांच्या मते, संविधानप्रधान लोकशाहीत राष्ट्रभक्तीची व्याख्या धर्माधिष्ठित चौकटीत बसवण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकतो. वीर सावरकरांना भारतरत्न देण्याच्या मागणीवरही ओवैसी यांनी प्रश्‍नचिन्ह उपस्थित केले. त्यांनी न्यायमूर्ती कपूर आयोगाच्या अहवालाचा उल्लेख करत सावरकरांच्या भूमिकेवर टीका केली. या संदर्भात त्यांनी ऐतिहासिक नोंदींचा आधार घेतला, असे सांगितले. सावरकरांविषयीचा वाद हा अनेक वर्षांपासून राजकीय चर्चेचा केंद्रबिंदू राहिला आहे आणि ओवैसींच्या वक्तव्याने त्यात आणखी रंग भरला आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ‘कयामत’ हा शब्द वापरल्याबद्दल ओवैसींनी टोला लगावला. बाबरी मशीद पुन्हा उभारली जाणार नाही, असे वक्तव्य करताना आदित्यनाथ यांनी हा शब्द वापरला होता. त्यावर प्रतिक्रिया देताना ओवैसी म्हणाले की, किमान एक उर्दू शब्द जरी वापरला तरी त्याचा अर्थ समजून घ्यावा. ‘कयामत’साठी हिंदीतील पर्यायी शब्द काय, असा प्रश्‍न त्यांनी उपस्थित केला.

टिपू सुलतानांनी इंग्रजांना पत्रे लिहून माफी मागितली नाही
हैदराबादमधील एका कार्यक्रमात ओवैसी यांनी टिपू सुलतान यांचा उल्लेख करत, त्यांनी इंग्रजांविरुद्ध लढा देत प्राण अर्पण केले, असे सांगितले. टिपू सुलतानांनी इंग्रजांना पत्रे लिहून माफी मागितली नाही, असा दावा त्यांनी केला. ओवैसी यांनी माजी राष्ट्रपती ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या ‘विंग्स ऑफ फायर’ या आत्मचरित्राचा उल्लेख करत, आधुनिक क्षेपणास्त्र तंत्रज्ञानाच्या संदर्भात टिपू सुलतानांच्या दूरदृष्टीचा उल्लेख केला. तसेच महात्मा गांधी यांनी ‘यंग इंडिया’मध्ये टिपू सुलतानांविषयी व्यक्त केलेल्या मतांचाही दाखला दिला.

COMMENTS