Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

माजी मंत्री थोरातांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनीच्या विद्यार्थ्यांचे रक्तदान

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वयं स्फूर्तीने रक्तदान शिबिरात सहभाग घेत  असून  141 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.  अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री  थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए.वेंकटेश, एनएसएस चे अधिकारी डॉ. जे. आर.रोकडे, प्रा. एस.एस. काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.  यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री  थोरात म्हणाल्या की, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. विज्ञान आणि मोठी प्रगती केली असली मात्र रक्त अद्याप तयार करता आले नाही.  युवकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे कारण आपल्या एका रक्तदानामुळे आपण तीन जणांचे प्राण वाचवतो.   अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन होत असून रक्तदान हे पवित्र कार्य असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी प्राध्यापक डॉ जे.आर रोकडे यांनी आभार मानले.

थोरातांकडे येणार प्रदेश काँगे्रसची सुत्रे ?
संगमनेरची शांतता बिघडवणार्‍यांना यशस्वी होऊ देऊ नका
विरोधी पक्षनेते पदावर काँगे्रसचा दावा

संगमनेर : माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालयात विद्यार्थ्यांनी राष्ट्रीय सेवा योजनेअंतर्गत स्वयं स्फूर्तीने रक्तदान शिबिरात सहभाग घेत  असून  141 विद्यार्थ्यांनी रक्तदान केले.

 अमृतवाहिनी अभियांत्रिकी महाविद्यालय व एसएमबीटी सेवाभावी हॉस्पिटल यांच्या संयुक्त विद्यमाने रक्तदान शिबिर संपन्न झाले. यावेळी संस्थेच्या कार्यकारी विश्वस्त शरयू देशमुख, कॅन्सरतज्ञ डॉ.जयश्री  थोरात, मुख्य कार्यकारी अधिकारी अनिल शिंदे, अकॅडमी डायरेक्टर डॉ. जे.बी.गुरव, प्राचार्य डॉ. एम. ए.वेंकटेश, एनएसएस चे अधिकारी डॉ. जे. आर.रोकडे, प्रा. एस.एस. काळे यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते.

 यावेळी बोलताना कॅन्सरतज्ञ डॉ. जयश्री  थोरात म्हणाल्या की, रक्तदान हे जगातील सर्वश्रेष्ठ दान आहे. विज्ञान आणि मोठी प्रगती केली असली मात्र रक्त अद्याप तयार करता आले नाही.  युवकांनी रक्तदानासाठी पुढे आले पाहिजे कारण आपल्या एका रक्तदानामुळे आपण तीन जणांचे प्राण वाचवतो.   अमृतवाहिनी संस्थेने विद्यार्थ्यांच्या गुणवत्ता पूर्ण शिक्षणाबरोबर सातत्याने विविध उपक्रमांचे आयोजन केले आहे. लोकनेते बाळासाहेब थोरात यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी रक्तदान शिबिराचे आयोजन होत असून रक्तदान हे पवित्र कार्य असल्याचे त्या म्हणाल्या. यावेळी प्राध्यापक डॉ जे.आर रोकडे यांनी आभार मानले.

COMMENTS