Homeताज्या बातम्यामहाराष्ट्र

मानवतेची महान सेवा – जीवनदान देणार्‍या एम्ब्युलन्स सेवेचा भोकरमध्ये भव्य शुभारंभ

नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते उद्घाटन; विविध मान्यवरांची उपस्थिती भोकर । प्रतिनिधी रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्य

भोकर वकील अभिवक्ता संघाच्या अध्यक्षपदी अ‍ॅड. परमेश्वर पांचाळ; उपाध्यक्षपदी अ‍ॅड. बालाजी सूर्यवंशी यांची निवड
पत्रकार व सामाजिक कार्यकर्त्यांकडून अजितदादांना भावपूर्ण श्रद्धांजली
नगर परिषदेच्या वतीने भोकरमध्ये स्वच्छता अभियान

नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते उद्घाटन; विविध मान्यवरांची उपस्थिती
भोकर । प्रतिनिधी
रस्ते अपघातांमध्ये जखमी झालेल्या नागरिकांना तात्काळ वैद्यकीय मदत मिळून त्यांचे प्राण वाचावेत या उदात्त हेतूने जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान यांच्या वतीने राष्ट्रीय महामार्गांवर सुरू असलेल्या मोफत 54 एम्ब्युलन्स सेवेतील एक सुसज्ज एम्ब्युलन्स भोकर तालुक्यासाठी उपलब्ध करून देण्यात आली.
या सेवेचा भव्य शुभारंभ बुधवारी तहसील कार्यालयासमोर नगराध्यक्ष भगवानराव दंडवे व तहसीलदार विनोद गुंडमवार यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. या प्रसंगी  पत्रकार डॉ. मनोज गिमेकर,  पत्रकार उत्तम वाबळे, अनिल डोईफोडे,  सरोदे, बालाजी नारलेवाड,  अशोक वाघमारे, तसेच तालुका सेवा समितीचे पदाधिकारी, महिला प्रतिनिधी, आजी-माजी पदाधिकारी व प्रतिष्ठित नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तालुकाध्यक्ष  गंगाधर पडवळे यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यामुळे उपलब्ध झालेली ही रुग्णवाहिका सेवा अपघातग्रस्त व गरजू रुग्णांसाठी आशेचा किरण ठरणार आहे. संकटकाळात तातडीची वैद्यकीय मदत वेळेवर पोहोचल्यास अनेकांचे प्राण वाचू शकतात. त्यामुळे हा उपक्रम समाजसेवेच्या नव्या पर्वाची सुरुवात मानला जात आहे. कार्यक्रमात बोलताना नगराध्यक्ष भगवानराव दंडवे यांनी संस्थेचे कार्य अत्यंत अनमोल व प्रेरणादायी असल्याचे सांगितले. समाजातील गरजू घटकांपर्यंत मदतीचा हात पोहोचविण्याचे काम संस्था सातत्याने करत असून अशा सेवाभावी उपक्रमांचे समाजाने स्वागत करणे आवश्यक असल्याचे त्यांनी नमूद केले. नगरसेवक राजेश्वर देशमुख यांनी रस्ते अपघातांमध्ये वेळेवर रुग्णवाहिका न मिळाल्याने अनेकांना जीव गमवावा लागतो, ही वस्तुस्थिती अधोरेखित करत मोफत रुग्णवाहिका सेवा ही अत्यंत उल्लेखनीय व पुण्यदायी असल्याचे सांगितले. तहसीलदार विनोद गुंडमवार यांनी महाराष्ट्रात तळागाळातील जनतेसाठी सातत्याने समाजोपयोगी उपक्रम राबविणारी अग्रगण्य संस्था म्हणून जगद्गुरु नरेंद्राचार्यजी संस्थान यांचा गौरवपूर्ण उल्लेख केला. शासनाच्या पलीकडे जाऊन संस्था जे कार्य करत आहे, त्याचा अभिमान असल्याची भावना त्यांनी व्यक्त केली. डॉ. मनोज गिमेकर व डॉ. फेरोज इनामदार यांनी भोकर शहरासाठी ही रुग्णवाहिका अत्यंत गरजेची असल्याचे सांगत या सेवेचा शहर व परिसरातील नागरिकांना मोठा फायदा होईल, असा विश्वास व्यक्त केला. युवा नेते संदीप पाटील गौड यांनीही संस्थेच्या मानवतावादी कार्याचे कौतुक केले. या एम्ब्युलन्स सेवेच्या शुभारंभामुळे भोकरसह परिसरातील तीन ते चार तालुक्यांतील नागरिकांना आपत्कालीन वैद्यकीय सेवेत मोठा दिलासा मिळणार असून अनेकांचे प्राण वाचविण्यास ही सेवा मोलाची ठरणार आहे.

COMMENTS